• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • हिवाळ्यात Hot Offer; या फ्रीजवर मिळतेय तब्बल 22 हजारहून अधिकची सूट, पाहा काय आहे ऑफर

हिवाळ्यात Hot Offer; या फ्रीजवर मिळतेय तब्बल 22 हजारहून अधिकची सूट, पाहा काय आहे ऑफर

Flipkart ने आपल्या खास सेल Big Diwali Sale ची घोषणा केली आहे. Big Diwali Sale आज 28 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : दिवाळीत अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ऑफर्स दिल्या जातात. जर तुम्हालाही तुमच्या घरासाठी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या असतील, तर Flipkart ने आपल्या खास सेल Big Diwali Sale ची घोषणा केली आहे. Big Diwali Sale आज 28 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. LG च्या 260L च्या फ्रॉस्ट फ्री डबल डोर टॉप माउंट कन्वर्टेबल फ्रीजची किंमती 33,190 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट Big Diwali Sale मध्ये हा फ्रीज तुम्ही तब्बल 22 हजारहून अधिक डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता. Flipkart Big Diwali Sale मध्ये या फ्रीजवर 8,200 रुपयांची सूट आहे. या सूटनंतर फ्रीजची किंमती 24.990 रुपये होते. परंतु तुम्ही या फ्रीजचं पेमेंट SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्डने केल्यास 1500 रुपयांची सूट आणखी मिळेल. जर तुमच्याकडे SBI कार्ड नसेल, तर कोणत्याही बँकेच्या कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करुन 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट आणखी मिळेल. त्याशिवाय या ऑफरमध्ये आणखी एक एक्सचेंज ऑफरही सामिल आहे. या एक्सचेंज ऑफरमध्ये 12 हजार रुपयांची बचत करता येईल. अशाप्रकारे एकूण मिळून या डिलमध्ये 22,700 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. त्यामुळे या फ्रीजची किंमत केवळ 10,490 रुपये होईल.

  स्वस्तातला मोह पडला महागात..! फोनच्या जागी असं काही आलं की..कधीच नाही विसरणार

  Flipkart च्या याच Big Diwali Sale मध्ये Orient इलेक्ट्रिक फॅन रुम हिटर 2799 रुपयांत खरेदी करता येईल. याची ओरिजनल किंमत 4,990 रुपये आहे. त्याशिवाय हा हिटर महिन्याला 96 रुपयांच्या EMI वरही खरेदी करता येईल. या सेलमध्ये Whirlpool च्या 20L मायक्रोवेव्ह ओव्हनवर 40 टक्क्यांची सूट आहे. 15,050 रुपयांचा ओव्हन 8895 रुपयांत खरेदी करता येईल. त्याशिवाय खरेदीवेळी SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास, आणखी 890 रुपयांची सूट मिळू शकेल.

  Price Hike : दिवाळीनंतर एसी, टीव्ही, फ्रीजही महागणार

  Motorola चा Wifi कनेक्टवाला स्मार्ट AC दिवाळीत 38 टक्क्यांच्या सूटसह 34,990 रुपयांत खरेदी करता येईल. याची ओरिजनल किंमत 56,549 रुपये आहे. SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 1500 रुपये आणखी डिस्काउंट मिळेल. तसंच इतरही कोणत्याही प्रकारे ऑनलाइन पेमेंट केल्यास 1500 रुपये इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
  Published by:Karishma
  First published: