मुंबई, 26 ऑक्टोबर : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे. एसी, टीव्ही, फ्रीज (AC, TV, fridge) यासारख्या इलेक्ट्रिक वस्तू घेण्याचा विचार असेल तर लगेच घेऊन टाका. कारण दिवाळीनंतर (Diwali Festival 2021) एसी, फ्रीजसह (Electronic Products) इतर कंज्युमर ड्युरेबल्स प्रोडक्टच्या किमती वाढू शकतात. कारण गेल्या काही दिवसात स्टील, तांबे, अॅल्युमिनियमच्या (Steel, Copper, Aluminium) किमती वाढल्या आहेत. त्यामुळे कंज्युमर ड्युरेबल्स कंपन्यांवर त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा दबाव निर्माण झाला आहे. त्यातच डिझेलच्या दरात वाढ झाल्याने मालाची वाहतूकही महाग झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांकडे दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सेमीकंडक्टर चिपचा तुटवडाही या कंपन्यांना सतावत आहे.
एबीपी न्युजच्या वृत्तानुसार, सणासुदीच्या काळात कंज्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनी अधिक विक्रीच्या पार्श्वभूमीवर दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळेच दिवाळीनंतर या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत सात ते दहा टक्क्यांनी वाढ करू शकतात, असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून धातूंच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Elon Musk यांची मोठी झेप; एका दिवसात संपत्तीत 27,15,00,00,00,000 रुपयांची वाढ
बहुतेक कंपन्या चीनमधून घटक आयात करतात आणि चीनमधून येणारे मालवाहतूक शुल्क (China Freight charges) पाच पटीने वाढले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी दरात वाढ केलेली नाही. परंतु ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी ही वाढलेली किंमत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी केली आहे. त्यामुळेच दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने दरवाढीची प्रक्रिया सुरू होईल.
LIC Policy : 1302 रुपये भरुन मिळवा 27.60 लाख रुपये, वाचा पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती
दसऱ्याला कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांची विक्री जबरदस्त झाली असून, त्यात ई-कॉमर्स कंपन्यांचा मोठा वाटा आहे. नवरात्रीमध्ये एसी, टीव्ही, फ्रीजला चांगली मागणी होती. आता कंपन्यांना अपेक्षा आहे की धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावरही चांगली विक्री दिसून येईल. Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केलेला बिग सेल अजूनही सुरू आहे. दिवाळीनंतर कंज्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर वस्तू महाग झाले असताना आता एसी टीव्ही, फ्रीज, गिझरही महाग होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electrical assistant, Investment, Money