Home /News /technology /

अवघ्या 369 रुपयात घरी घेऊन या स्मार्टफोन! स्वस्तात मिळतील Apple, OnePlus आणि Samsung चे मोबाइल

अवघ्या 369 रुपयात घरी घेऊन या स्मार्टफोन! स्वस्तात मिळतील Apple, OnePlus आणि Samsung चे मोबाइल

स्मार्टफोन्सची नवनवीन मॉडेल्स एवढ्या वेगाने बाजारात येत आहेत, की तुम्ही आज एक फोन घेतला तर पुढच्याच आठवड्यात त्याहून चांगला फोन लाँच झालेला दिसून येईल. तुम्हाला देखील असे नवीन फोन्स वापरणं आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 16 जुलै: आजकाल कमी किंमतीमध्ये बरेच फीचर्स देणारे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, अ‍ॅपल (Apple), वन प्लस (OnePlus) किंवा सॅमसंगच्या (Samsung) महागड्या स्मार्टफोन्सची सर त्यांना नाही, हेही तितकंच खरं. स्मार्टफोन्सची नवनवीन मॉडेल्स एवढ्या वेगाने बाजारात येत आहेत, की तुम्ही आज एक फोन घेतला तर पुढच्याच आठवड्यात त्याहून चांगला फोन लाँच झालेला दिसून येईल. काही जणांना दर दोन-तीन महिन्यांनी नवा फोन घेणं परवडतंही. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे परवडणारं नसतं. मात्र आता तुम्हीही वारंवार वेगवेगळे फोन वापरु शकणार आहात. इंटरनेटवर सध्या बऱ्याच अशा वेबसाईट्स आहेत, ज्यावरुन तुम्ही स्मार्टफोन्स चक्क भाडे तत्वावर घेऊ शकाल (Smartphones on Rent). पेटीएममॉल (Paytm mall), रेंटोमोजो (Rentomojo) आणि फ्लेक्सिरेंट (Flexirent) अशा या वेबसाईट्स आहेत. याठिकाणी तुम्ही मासिक भाडं देऊन महागातले महाग स्मार्टफोन्सही मागवू शकता. याचं मासिक भाडं हे केवळ 369 रुपयांपासून सुरू होतं. फोनच्या किंमतीनुसार पुढे हे भाडं 2 ते 3 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतं. एवढंच काय, तर या वेबसाईट्स तुम्हाला हे स्मार्टफोन्स मोफत (Free trial) ट्रायलसाठीही देतात. ट्रायल कालावधी संपल्यानंतर पुढे 6 किंवा 12 महिन्यांहून अधिक काळासाठी तुम्ही तो फोन भाडे तत्वावर वापरू शकता. हे वाचा-काय सांगता! आता घामानेच चार्ज होणार मोबाईल फोन; चार्जर, पॉवर बँकची गरजच नाही आजकाल दहा किंवा पंधऱा हजार रुपयांचा नवा फोन घेतल्यानंतर तो साधारणपणे दोन ते तीन वर्षं वापरला जातो. मधल्या काळात दुसऱ्या फोन्समध्ये नवीन फीचर्सही आलेले असतात. त्यामुळे मग आपण पुन्हा नवा फोन घेतो. त्या तुलनेत मग, महिन्याला शे-पाचशे रुपये देऊन अशा प्रकारे नवीन फोन वापरणं जास्त परवडणारं आहे. कोणत्या स्मार्टफोनचं किती भाडं? प्रत्येक वेबसाईट्सवर फोन्सच्या मॉडेलनुसार वेगवेगळं भाडं आकारलं जातं. एकाच मॉडेलच्या भाड्यामध्ये जास्त फरक दिसून येत नाही. सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 (Samsung Galaxy Note 9) हा स्मार्टफोन आपल्याला साधारणपणे 1,949 रुपये प्रति महिना भाड्याने मिळू शकतो. तर, गॅलेक्सी एस10एस (Galaxy S10s) हा स्मार्टफोन साधारणपणे 1,639 रुपयांना मिळतो. हे वाचा-Google वर तुम्ही embarrassing सर्च केलं? या Trick ने लगेच करा गायब हेच अ‍ॅपलसारख्या महागड्या फोन्सच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आयफोन एक्सएस मॅक्सचं (iphone XS max) भाडं हे साधारणपणे 3,399 रुपये आहे. तर, आयफोन एक्सचं भाडं हे 2,869 रुपयांच्या आसपास आहे. वन प्लस 7 प्रो (OnePlus 7 Pro) फोनच्या विविध व्हेरियंटचे वेगवेगळे दर आहेत. फोनच्या बेसिक मॉडेलसाठी 1,519 रुपये मोजावे लागतील; तर 6 किंवा 12 जीबीच्या व्हेरियंटसाठी 3,949 रुपयांपर्यंत भाडं आकारलं जाईल. यामध्ये रेडमीसारखे (Redmi) स्वस्त फोनही भाड्याने उपलब्ध आहेत. रेडमी नोट 6 प्रो स्मार्टफोन हा अवघ्या 369 रुपये प्रतिमहिना भाड्याने उपलब्ध आहे.
First published:

Tags: Apple, Iphone, Oneplus, Redmi, Samsung, Samsung galaxy, Samsung galaxy offers

पुढील बातम्या