मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

काय सांगता! आता घामानेच चार्ज होणार मोबाईल फोन; चार्जर किंवा पॉवर बँकची गरजच नाही

काय सांगता! आता घामानेच चार्ज होणार मोबाईल फोन; चार्जर किंवा पॉवर बँकची गरजच नाही

प्रत्येक फोनचा हा नंबर वेगळा असतो. याच नंबरद्वारे पोलीस फोन ट्रॅक करतात. चोरी केलेल्या फोनमध्ये दुसरं सिम टाकलं तरीही या नंबरद्वारे फोन ट्रॅक करता येतो. पण दुसरं सिम टाकल्यानंतर तो फोन एकदा तरी वापरला गेला पाहिजे, तर पोलीस IMEI नंबरने फोन ट्रॅक करतात.

प्रत्येक फोनचा हा नंबर वेगळा असतो. याच नंबरद्वारे पोलीस फोन ट्रॅक करतात. चोरी केलेल्या फोनमध्ये दुसरं सिम टाकलं तरीही या नंबरद्वारे फोन ट्रॅक करता येतो. पण दुसरं सिम टाकल्यानंतर तो फोन एकदा तरी वापरला गेला पाहिजे, तर पोलीस IMEI नंबरने फोन ट्रॅक करतात.

हे उपकरण आपण हातमोज्यांप्रमाणे आपल्या बोटांवर घालू शकतो.

कॅलिफोर्निया, 15 जुलै : सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा लाइट जात असते. यामध्ये आपल्याला सर्वांत जास्त काळजी असते, ती आपल्या मोबाइलच्या चार्जिंगची (Mobile charging). मोबाइल चार्जिंगसाठी (Smartphone charging) आपण अशा वेळी पॉवर बँकसारख्या पर्यायांचा वापर करतो. पण पॉवर बँकलाही आधी चार्ज करावं लागतंच. मग जर मोबाइल चार्ज करण्यासाठी या सगळ्याची गरजच पडली नाही तर? यासाठीच संशोधकांनी असं उपकरण विकसित केलं आहे, ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःच्या घामानेच आपला स्मार्टफोन चार्ज (Human sweat will charge mobile) करू शकाल.

कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या (California University) संशोधकांनी या उपकरणाची निर्मिती केली आहे. आपल्या शरीराच्या घामापासून वीजनिर्मिती (Electricity from sweat) करण्याची क्षमता या उपकरणामध्ये आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे उपकरण 10 तास वापरल्यास एक स्मार्टवॉच (Smartwatch) चार्ज करण्याइतपत ऊर्जा तयार होऊ शकते.

संशोधकांनी सांगितलं, की हे उपकरण आपण हातमोज्यांप्रमाणे आपल्या बोटांवर घालू शकतो. (Finger Chatrger) बोटांवर तयार होणाऱ्या घामापासून हे ऊर्जा निर्माण करेल. दिवसभर विविध कामांसाठी आपण हातांचा वापर करत असतो, त्यामुळे आपल्या बोटांवर बऱ्याच प्रमाणात घाम तयार होत राहतो. याच घामाचा आता आपल्याला उपयोग होणार आहे.

हे वाचा - ना पैसे ना स्मार्टकार्डची गरज; आता तुमच्या नखांनीच करा मनसोक्त शॉपिंग

हे डिव्हाइस (New Technology) तयार करण्यासाठी स्मार्ट स्पंज मटेरियल वापरण्यात आलं आहे. हे स्पंज आपल्या हातावर घामामुळे तयार झालेली आर्द्रता शोषून घेतात, आणि पुढे त्याच्या मदतीने कंडक्टर्स त्याचं रूपांतर विजेमध्ये करतात. हे संशोधन सध्या प्राथमिक टप्प्यामध्ये आहे. पुढे या डिव्हाइसची क्षमता वाढवण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. सध्या या डिव्हाइसच्या माध्यमातून एक स्मार्टफोन चार्ज करायचा असेल, तर किमान तीन आठवडे सलग ते वापरणं गरजेचं आहे; पण लवकरच कमी वेळात अधिक ऊर्जा निर्माण करणारं डिव्हाइस विकसित करण्यात यश येईल, असं या संशोधकांनी स्पष्ट केलं.

या डिव्हाइसमधून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी घामाची गरज असली, तरी तुम्हाला विशेष मेहनत करावी लागणार नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. सध्या बाजारात इतरही अशी वेअरेबल गॅजेट्स आहेत, की जी वीज निर्माण करू शकतात; पण त्या सगळ्यासाठी तुम्हाला व्यायाम किंवा इतर अंगमेहनतीचं काम करावं लागतं. हे डिव्हाइस मात्र हाताच्या बोटांना जोडलेलं असल्यामुळे टायपिंग, टेक्स्टिंग अशी साधी कामं करूनही तुम्ही ऊर्जा निर्माण करू शकाल. एवढंच नाही, तर झोपेतही तुमच्या हाताला येणाऱ्या घामामुळे ऊर्जा निर्माण होत राहील.

हे वाचा - Google वर तुम्ही embarrassing सर्च केलं? या Trick ने लगेच करा गायब

सध्या दोन मिनिटांत या उपकरणाने तयार केलेल्या ऊर्जेतून केवळ स्क्रीन आणि सेन्सर्सचं काम चालू शकतंय. आता शक्तिशाली उपकरणनिर्मितीसाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphone, Technology