नवी दिल्ली, 4 मार्च : तुम्ही कोणतंही वाहन चालवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वाहनांशी संबंधित एक नवं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. गाड्यांच्या पुढील आरशांवर आता लवकरच फिटनेस सर्टिफिकेट (Fitness certificate) आणि रजिस्ट्रेशन मार्क (Registration Mark) लावणं अनिवार्य होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी केलं आहे. ज्यात नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वाहनांवर फिटनेस सर्टिफिकेट आणि मोटर वाहन रजिस्ट्रेशन मार्क वॅलिडिटी नियमांत दिल्याप्रमाणे दाखवणं बंधनकारक असणार आहे.
हे वाचा - या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग
काय आहे नवा नियम? नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हेवी गुड्स, पॅसेंजर व्हीकल, मीडियम गुड्स आणि लाइट मोटर व्हीकल्ससाठी हे विंड स्क्रीनच्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात द्यावं लागेल. तर ऑटो-रिक्षा, ई-रिक्षा, ई-कार्ट आणि क्वाड्रिसायकलसाठी हे विंड स्क्रीनच्या डाव्या बाजूला लावलं जाईल.
हे वाचा - Driving License शिवाय चालवता येईल वाहन, ट्रॅफिक पोलीस कापू शकत नाही चालान
टू-व्हीलरसाठी असा असेल नियम - टू-व्हीलरसाठी वाहनाच्या निर्धारित भागावर फिटनेस सर्टिफिकेट आणि मोटर वाहन रजिस्ट्रेशन मार्क लावला जाईल. यासाठीचा फॉन्ट टाइप एरियल बोल्ड फॉन्ट असेल. निळ्या रंगाच्या बॅकग्राउंडवर पिवळ्या रंगात हे बसवलं जाईल. दरम्यान, ड्रायव्हिंग लायसन्स फिजीकली जवळ न ठेवता तुम्ही अधिकृत App द्वारे ते ऑनलाइन रुपात जवळ ठेवू शकता. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स विरसल्याची, फाटल्याची कोणतीही चिंता राहणार नाही. तसंच ट्रॅफिक पोलिसांना सरकारी अधिकृत App मधील हे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणं कायदेशीर आहे. ट्रॅफिक पोलिसांना चालक डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एम-परिवहन (mParivahan) मोबाइल App वर डिजीटल स्वरुपात वाहतुकीची कागदपत्रं दाखवू शकतात. DigiLocker मध्ये डॉक्युमेंट सेव्ह ठेवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत डॉक्युमेंटची हार्ड कॉपी ठेवण्याची गरज नाही.