Home /News /technology /

या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग

या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग

आंतरराष्ट्रीय कार सेफ्टी रेटिंग एजेन्सी ग्लोबल एनसीएपीने (NCAP) भारतीय ऑटोमोबाइल बाजारात सर्वात सुरक्षित कार्सची (Safe Cars) यादी अपडेट केली आहे.

    नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय कार सेफ्टी रेटिंग एजेन्सी ग्लोबल एनसीएपीने (NCAP) भारतीय ऑटोमोबाइल बाजारात सर्वात सुरक्षित कार्सची (Safe Cars) यादी अपडेट केली आहे. या एजेन्सीने नुकतंच मेड इन इंडिया कारचं टेस्टिंग केलं आहे. एजेन्सीने हॅशटॅग सेफरकार्स फॉर इंडिया कँपेन अंतर्गत (#SaferCarsForIndia campaign) आतापर्यंत 50 कार्सची क्रॅश टेस्ट केली गेली आहे. या सेगमेंटमध्ये महिंद्रा (Mahindra), टाटा (Tata), होंडासारखे (Honda) ब्रँड होते. या कार्सचं वेगवेगळ्या स्तरावर टेस्टिंग केलं जातं आणि अपघाताच्या शक्यतेवर क्रॅश केलं जातं. भारतातील 5 सर्वात सुरक्षित कार्स - महिंद्रा XUV700 (Mahindra XUV700) - महिंद्राच्या फ्लॅगशिप एक्सयूवी 700 ला NCAP ने भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरवलं आहे. या कारचं टेस्टिंग मागील वर्षी करण्यात आलं होतं. या XUV कारला 7 एयरबॅग्स, 360 डिग्री व्यू कॅमेरा, ब्लाइंड व्यू मॉनिटरिंग आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंटसारखे फीचर्स आहेत. तसंच स्मार्ट पायलट असिस्टेंटसारखे आधुनिक फीचर्सही आहेत. Tata Punch - टाटा Punch या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा पंचला अडल्टसाठी फाइव्ह स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तर चाइल्ड रेटिंगमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटाचीही तिसरी कार आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात सेफ्टीच्या दृष्टीने ओळख मिळाली आहे. याआधी अल्ट्रॉज आणि टाटा नेक्सॉनही सेफ्टीच्या दृष्टीने पॉप्युलर कार्स ठरल्या आहेत.

    हे वाचा - Tata Nano ला बनवलं हेलिकॉप्टर, लग्नासाठी होतेय मोठी बुकिंग; पाहा किती आहे भाडं

    Mahindra XUV300 - महिंद्रा एक्सयूवी 300 महिंद्राची पहिली कार आहे, जिने NCAP टेस्ट पास केली. ही पहिली कार आहे, ज्याला सेफर चाइल्ड अवॉर्ड मिळाला आहे. या कारला अडल्टसाठी 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. तर चाइल्ड रेटिंगमध्ये 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. Mahindra ची ही कार XUV सेगमेंट कार आहे. Tata Altroz - टाटा अल्ट्रोज एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. याला ग्लोबल NCAP वर क्रॅश टेस्टिंगदरम्यान वयोवृद्धांसाठी 5 स्टार रेटिंग मिळालं, तर लहान मुलांसाठी 3 स्टार रेटिंग देण्यात आलं. टाटा अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक कार असून याची मारुति बलेनोसह टक्कर आहे.

    हे वाचा - की-बोर्डवर ABCD अशा क्रमाने का नसतात अक्षरं? काय आहे यामागची कहाणी?

    Tata Nexon - सेफ्टीच्या दृष्टीने टॉप 5 मध्ये टाटाची ही तिसरी कार आहे. अडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये कारला 5 स्टार रेटिंग आहे. तर चाइल्ड सेफ्टीसाठी 3 रेटिंग मिळालं आहे. Nexon मध्ये ड्युअल फ्रंट एयरबॅग्स मिळतात.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Car, Tata group, Tech Mahindra

    पुढील बातम्या