मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

6G नेटवर्कसाठी Jio करणार संशोधन, युनिव्हर्सिटी ऑफ Oulu सोबत केली हातमिळवणी

6G नेटवर्कसाठी Jio करणार संशोधन, युनिव्हर्सिटी ऑफ Oulu सोबत केली हातमिळवणी

जिओ इस्टोनिया ओयु (Jio Estonia OÜ) आणि फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ओलूनं (The University of Oulu) एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही घटकांच्या भागीदारीमुळं 6G नेटवर्कसाठी जगभरातील संधी शोधण्यासाठी एक भक्कम पाया प्रस्थापित होणार आहे.

जिओ इस्टोनिया ओयु (Jio Estonia OÜ) आणि फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ओलूनं (The University of Oulu) एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही घटकांच्या भागीदारीमुळं 6G नेटवर्कसाठी जगभरातील संधी शोधण्यासाठी एक भक्कम पाया प्रस्थापित होणार आहे.

जिओ इस्टोनिया ओयु (Jio Estonia OÜ) आणि फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ओलूनं (The University of Oulu) एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही घटकांच्या भागीदारीमुळं 6G नेटवर्कसाठी जगभरातील संधी शोधण्यासाठी एक भक्कम पाया प्रस्थापित होणार आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 24 जानेवारी : टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये मोठी स्पर्धा आहे. टेलिकम्युनिकेशन सेक्टरमधील टॉपला असलेल्या रिलायन्स जिओनं (Reliance Jio) भारतामध्ये 5G डेटा नेटवर्क आणण्याची घोषणा केली आहे. 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करतं. 5G आपल्या नेटवर्क स्लायसिंगद्वारे (Network Slicing) भव्य मशीन टाईप कम्युनिकेश (Machine-type Communications) आणि व्हर्च्युअल नेटवर्क लागू करण्याचीही शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवतं.

6G नेटवर्क तर 5G च्याही पलीकडे जाऊन काम करतं. 6G आपल्या टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सीद्वारे (Terahertz frequencies), सेल-फ्री मिमो (MIMO), इंटेलिजेंट सरफेस आणि उच्च क्षमता यासारख्या युनिक क्षमतांद्वारे डिजिटायझेशनचा (Digitisation) विस्तार करतं. एकूणच जर 5G आणि 6G नेटवर्क फॅसिलिटीजं एकत्र उपलब्ध असतील तर ग्राहक आणि एंटरप्राइझ वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. ही गोष्ट लक्षात घेऊन जिओ इस्टोनिया ओयु (Jio Estonia OÜ) आणि फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ओलूनं (The University of Oulu) एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही घटकांच्या भागीदारीमुळं 6G नेटवर्कसाठी जगभरातील संधी शोधण्यासाठी एक भक्कम पाया प्रस्थापित होणार आहे.

माध्यमांना दिलेल्या निवेदनानुसार, 'या सहयोगामुळं इंडस्ट्री आणि अॅकॅडमिक क्षेत्रामधील जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांना एकत्र आणून आंत्रप्रन्युअरशीप (Entrepreneurship) वाढण्यास मदत होईल. एरियल आणि स्पेस कम्युनिकेशन (Aerial and Space communication), होलोग्राफिक बीमफॉर्मिंग (Holographic Beamforming), सायबर सिक्युरिटी, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आणि फोटोनिक्समधील 3D कनेक्टेड इंटेलिजन्स अशा क्षेत्रांसाठी जिओ आणि युनिव्हर्सिटी एकत्र काम करणार आहे.

हे वाचा - VIDEO: रिक्षा आहे की लक्झरी कार,ऑटोच्या भन्नाट मोडिफिकेशने Anand Mahindraही चकित

आपल्या दैनंदिन डिजिटल गरजा आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याची 5G ची क्षमता आहे, त्यापेक्षा अधिक चांगली क्षमता 6G तंत्रज्ञान पुरवेल असा त्या तंत्रज्ञानाचा दावा आहे. नॅनो-थिंग्ज इंटरनेट आणि एआयसारख्या (AI) अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये प्रचंड व्यवसाय क्षमता (Business Potential) आहे. 6G रिसर्च आणि युनिव्हर्सिटी ऑफ ओलूमधील प्रारंभिक गुंतवणूक जिओ लॅबच्या 5G मधील क्षमतांना पूरक ठरू शकते आणि 6G ला प्रत्यक्षात आणू शकतं," अशी माहिती जिओ प्लॅटफॉर्मचे सीनिअर व्हाईस प्रेसिडंट आयुष भटनागर (Aayush Bhatnagar) यांनी दिली.

युनिव्हर्सिटीसोबत हातमिळवणी केल्यामुळे डिफेन्स, ऑटोमोटिव्ह, व्हाईट गुड्स, इंडस्ट्रीयल मशीनरी, ग्राहकोपयोगी वस्तू, कार्यक्षम उत्पादन, नॉव्हेल पर्सनल स्मार्ट डिव्हाईस एन्व्हायर्नमेंट, अर्बन कम्प्युटिंग आणि ऑटोनॉमस ट्रॅफिक सेटिंग्जसारख्या क्षेत्रांतील 6G एनेबल्ड उत्पादनांशी स्पर्धा करण्यास मदत होईल, असंही भटनागर म्हणाले.

हे वाचा - आता स्मार्टफोनमध्ये नॅनो सिमचीही गरज नाही, येणार नवं iSIM; वाचा कसा होणार वापर

'जिओ इस्टोनियासोबतंच आणखी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आम्हाला आनंद होत आहे. जगातील सुरुवातीच्या प्रमुख 6G रिसर्च प्रोग्रॅमचा लीडर या नात्यानं, युनिव्हर्सिटी ऑफ ओलू 6G तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशन्सवर लक्ष केंद्रित करते. आम्ही जिओ इस्टोनिया आणि संपूर्ण रिलायन्स ग्रुपसोबत (Reliance Group) टारगेटेड रिसर्च प्रोग्रॅम्सवर काम करण्यास उत्सुक आहोत. हे रिसर्च प्रोग्रॅम्स, एंड-यूजर्सच्या भविष्यातील गरजा भागवण्यासाठी वायरलेस एंड-टू-एंड सोल्यूशन्स पुरवण्यात मदत करतील,' अशी माहिती युनिव्हर्सिटीतील 6G फ्लॅगशिपचे डिरेक्टर प्रोफेसर मॅटी लावा-अहो (Professor Matti Latva-aho) यांनी दिली.

'जिओचे भारतात 400 दशलक्ष पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या गरजेनुसार आणि डिजिटल सेवा आणि व्हर्च्युअल वर्ल्डचा विकास लक्षात घेता मोठ्या प्रमाणात डेटा ट्रान्समिट करण्याची क्षमता वाढवणं कठीण होत आहे,' असं जिओ इस्टोनियाचे सीईओ तावी कोटका (Taavi Kotka) यांनी स्पष्ट केलं. युनिव्हर्सिटी ऑफ ओलूच्या सहकार्यानं, आम्ही भविष्यात जागतिक पातळीवर विकसित होत राहू याची खात्री आहे, असंही कोटका म्हणाले.

जिओकडे (Jio Platforms) आपल्या 5G आरएएन आणि कोअर प्लॅटफॉर्म्ससाठी अगोदरच एक अॅक्टिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अस्तित्त्वात आहे. या प्रोग्रॅमला जिओ लॅब्जद्वारे फॅसिलिटी दिल्या जातात. आता युनिव्हर्सिटीसोबत केलेल्या हातमिळवणीमुळे जिओच्या 5G क्षमतेचा आणखी विस्तार होईल. त्याच्या मदतीनं तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधन आणि विकासाव्यतिरिक्त 6G मधील वापराच्या शक्यता शोधण्याचं काम जिओ करू शकेल.

First published:

Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news