मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

भारतीयांच्या सुरक्षेसाठी असलेलं Data Protection Bill अंतिम टप्प्यात; लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता

भारतीयांच्या सुरक्षेसाठी असलेलं Data Protection Bill अंतिम टप्प्यात; लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता

दोन वर्षात पाचवेळा (personal data protection bill 2021) विस्तार केल्यानंतर आता सरकारने या बिलाला लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे. पार पडलेल्या या बैठकीनंतर आता त्याचा मसूदा हा लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्याकडे पाठवला जाणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : देशात मागील काही वर्षांपासून चर्चत अससेल्या Data Protection बिलासंदर्भात आता नवी माहिती समोर येत आहे. वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयकासंदर्भात (data protection bill India latest news) संसदीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. ही बैठक भारतीय जनता पक्षाचे खासदार पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

त्यामुळे आता दोन वर्षात पाचवेळा (personal data protection bill 2021) विस्तार केल्यानंतर सरकारने या बिलाला लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे. पार पडलेल्या या बैठकीनंतर आता त्याचा मसूदा लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्याकडे पाठवला जाणार आहे.

Google Play Store वर Joker Malware ची एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स

2017 मध्ये तयार झाला होता मसूदा -

केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधी 2019 मध्ये डेटा संरक्षण विधेयकाला मंजूरी दिली होती. जो भारतीय नागरिकांच्या गोपनीयता आणि सुरक्षेशी संबंधित आहे. ऑगस्ट 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या बिलाचा मसूदा तयार (joint parliamentary committee on personal data protection bill 2021) करण्यात आला होता. तर 'गोपनीयतेच्या अधिकाराला' मूलभूत अधिकार म्हणून मान्यतादेखील देण्यात आली होती.

सावधान! Amazon कडे आहे तुमचा सर्व प्रायव्हेट डेटा? पाहा काय आहे प्रकरण...

12 नोव्हेंबरला झाली होती बैठक -

संसदेच्या संयुक्त समितीतर्फे मसूद्यावर चर्चा करण्यासाठी 12 नोव्हेंबरला एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर 11 डिसेंबर 2019 ला लोकसभेत मांडण्यात आलेल्या Personal Data Protection Bill मध्ये संशोधन करण्यासाठी संयुक्त समिती बनवण्यात आली होती. त्यामुळे आता संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हे बिल मांडलं जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: India, Sansad loksabha, User data