इन्स्टाग्रामचा फेसबुक अवतार! लॉंच झाले नवीन अ‍ॅप, जाणून घ्या याचे फिचर

इन्स्टाग्रामचा फेसबुक अवतार! लॉंच झाले नवीन अ‍ॅप, जाणून घ्या याचे फिचर

फेसबुकच्या वतीनं खास मित्रांसोबत चॅट करण्यासाठी लॉंच करण्यात आलं नवीन अ‍ॅप.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : इन्स्टाग्राम युझरसाठी एक आनंदाची बातमी आहे, फेसबुकच्या वतीनं एक नवीन अ‍ॅप लॉंच केले आहे. हे अ‍ॅप थ्रेड्स मेसेजिंग अ‍ॅप, फेसबुकच्या वतीनं चॅट करण्यासाठी हे अ‍ॅप लॉंच करण्यात आले आहे. टेक एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीत, या अ‍ॅपमुळं तुम्ही तुमच्या खास मित्र मैत्रिणींसोबत चॅट करू शकतात. ऑगस्टमध्ये या अ‍ॅपची टेस्टिंग करण्यात आली, त्यानंतर आता हे अ‍ॅप लॉंच करण्यात येणार आहे.

या अॅपमध्ये फेसबुकप्रमाणे सर्व फिचर असणार आहेत. फेसबुकच्या Instagram Threads या अ‍ॅपमुळं तुम्हाला आपल्या जवळच्या मित्रांसोबत संवाद करता येणार आहे. इन्स्टाग्रामचे मुख्य अधिकारी रॉबी स्टेन यांनी एका ब्लॉगमध्ये, “लोकांना आपल्या जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवता यावा यासाठी हे अ‍ॅप लॉंच करण्यात आले आहे. यात व्हिडीओ आणि फोटो एकमेकांना पाठवता येणार आहेत. तसेच, आपल्या मित्र मैत्रिणींसोबत व्हिडीओ चॅटही करता येणार आहे. या नवीन अ‍ॅपमध्ये फेसबुकचे सर्व फिचर असणार आहेत”, असे सांगितले.

वाचा-70 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा मालक झाल्यानंतर झुकेरबर्ग म्हणतो...

सध्या इन्स्टाग्रामवर क्लोज फ्रेंड्स असा फिचर आहे, यात तुम्ही काही स्टोरी किंवा पोस्ट केवळ आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना पाठवू शकता. मात्र, थ्रेड्स अॅपच्या मदतीनं हे काम अजून सोपे होणार आहे. यात डेडीकेटेड इनबॉक्स, नोटीफिकेशन फक्त तुमच्या जवळच्या मित्रांसाठी असणार आहे.

स्टेट्स अपडेटचे फिचर

‘इंस्टाग्राम थ्रेड्स’ अ‍ॅपच्या मदतीनं स्टेट्स ऑटो अपडेट होऊ शकते. या अ‍ॅपमध्ये आधीपासूनच ' अ‍ॅट द जिम, अ‍ॅट होम, अ‍ॅट द बीच आणि लो बॅटरी', असे फिचर्स असणार आहेत. यामुळं तुम्ही लगेचच स्टेटस अपडेट करू शकता.

वाचा-WhatsApp युझरसाठी महत्त्वाची बातमी, एका GIF फाइलमुळे होऊ शकतो फोन हॅक!

मोबाईलमध्ये थेट ओपन होणार कॅमेरा

थ्रेडस अ‍ॅपमध्ये मोबाईल फोनमध्ये थेट कॅमेरा ओपन होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही थेट फोटो शेअर करू शकतात. याशिवाय युझर आपल्या मर्जीनं स्टेटसही निवडू शकतात. इन्स्टाग्रामचे हे अ‍ॅप सध्या iOS आणि Android दोन्हीमध्ये उपलब्ध आहे.

वाचा-Apple विरोधात ठोकला 10 लाखांचा दावा, कारण वाचून iPhone घेताना कराल हजारदा विचार

VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!

Tags: Instagram
First Published: Oct 6, 2019 07:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading