न्यूयॉर्क, 21 फेब्रुवारी : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता एका अजब कारणाने त्याची चर्चा सुरू झाली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात पत्रकारिता कऱणाऱ्या स्टीव्हन लेवी यांच्या पुस्तकात झुकेरबर्गबद्दल धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. टेक्नॉलॉजी मॅगझील वायर्डचे संपदाक असलेल्या लेवी यांनी फेसबुक : द इनसाइड स्टोरी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी दावा केला आहे की, मार्क झुकेरबर्गने त्याचा घाम पुसण्यासाठी एक टीम ठेवली होती. कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला आहे. लेवी यांच्याकडे 2006 मध्ये झुकेरबर्गची डायरी असल्याचंही म्हटलं जात आहे.
लेवी यांच्या पुस्तकात झुकेरबर्गच्या आयुष्याशी निगडीत अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला आहे. झुकेरबर्ग मुलाखत, भाषण किंवा मोठ्या इव्हेंटच्या आधी नर्व्हस होत असे तेव्हा त्याला घाम यायचा. त्याच्या या समस्येवर उपाय म्हणून एक टीम ठेवली होती. या पुस्तकात 2010 मध्ये झुकेरबर्गच्या मुलाखतीचा उल्लेख करण्यात आला आहे.
ब्लूमबर्गने या पुस्तकाची समीक्षा केली आहे. या पुस्तकावरून उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटलं की, मी कधीच माझ्या स्टाफला असं काम नाही सांगितलं. मात्र माझ्या टीमने मला असं करण्याचा सल्ला दिला असता तर ते करेन.
वाचा : मायक्रोसॉफ्टची मोठी चूक, विंडोज अपडेट न करण्याचा युजर्सना सल्ला
झुकेरबर्गची कम्युनिकेशन टीम त्यांच्या कोणत्याही भाषण, इव्हेंट किंवा मुलाखती आधी त्याचा घाम पुसायची असं पुस्तकात म्हटलं आहे. मात्र, फेसबुकचे प्रवक्ता लिज बुर्जुआ यांनी याबाबत म्हटलं की, या दाव्यात तथ्य असेल की नाही याबाबत शंका आहे. मात्र असं असेल तर ते कम्युनिकेशन टीमच्या सांगण्यावरूनच केलं जात असेल.
वाचा : सावधान! WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook