Home /News /technology /

मायक्रोसॉफ्टची मोठी चूक, विंडोज अपडेट न करण्याचा युजर्सना सल्ला

मायक्रोसॉफ्टची मोठी चूक, विंडोज अपडेट न करण्याचा युजर्सना सल्ला

विंडोज 10 चे अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सना अनेक अडचणी आल्या. यामुळे अनेक युजर्सचे विंडोज अकाउंट आपोआप डिलीट झाले.

    नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिममध्ये नेहमीच नवे अपडेट देत असते. गेल्याच आठवड्यात कंपनीने विंडोज 10 लाँच केले होते. 11 फेब्रुवारीला मायक्रोसॉफ्ट पॅच ट्युजडे प्रोग्रॅम अंतर्गत अपडेटचे नोटिफिकेशन युजर्सना पाठवले होते. यामध्ये तब्बल दहा लाख विंडोज 10 वापरणाऱ्यांना KB4532693 च्या अपडेटचे नोटिफिकेशन मिळाले होते. मात्र हे अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सना अनेक अडचणी आल्या. यामुळे अनेक युजर्सचे विंडोज अकाउंट आपोआप डिलीट झाले. विंडोज अपडेट केल्यानंतर ओरिजनल अकाउंटच्या जागी टेम्पररी अकाउंट अॅक्टिवेट होत आहेत. म्हणजेच कोणत्याही वॉर्निंगशिवाय युजर्सची सर्व माहिती, अॅप्स डिलीट होत आहेत. तर अपडेट अनइन्स्टॉल करून कॉम्प्युटर, लॅपटॉप रिस्टार्ट केल्यानंतर खरं अकाउंट रिस्टोअर होत आहे. मात्र प्रत्येक युजर्सचे अकाउंट पुर्ववत होतंय असं नाही. अपडेटमध्ये अशा समस्या आल्यानंतर युजर्सनी तक्रार केली आहे. एका युजर्सने रागाने म्हटलं की, लेटेस्ट अपडेटसाठी मायक्रोसॉफ्टचे आभार, ज्यांनी माझ्या संपूर्ण सिस्टिमचं सेटिंग डिलीट केलं. सिस्टिममध्ये सगळं बेसिक सेटिंग झालं आहे. माझ्या प्रत्येक प्रोग्रॅमची माहिती आणि सेटिंग डिलिट झालं आहे. सिस्टिम अॅप्सचे प्रोग्रॅमही डिलीट झाले त्याशिवाय किबोर्ड सेटिंग, भाषा, स्क्रीन रिझोल्यूशन गेलं आहे. अपडेटही बंद झाले आहे. मायक्रोसॉफ्टने आपली मोठी चूक झाल्याचं मान्य केलं आहे. या समस्येवर बोलताना त्यांनी चूक कबूल करताना इंजिनिअर्स त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. वाचा : Airtel चा मोठा झटका! खूप महाग झाला स्वस्तातला प्लान, आता येणार जास्त बिल याआधी मायक्रोसॉफ्टने सिक्युरिटी अपडेट KB4524244 हे डिलीट केलं होतं. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये बग येत होता. या अपडेटमध्ये ‘Push Button Reset’होण्यास अडचण येत होती. मात्र सध्या जी समस्या आहे त्याबद्दल युजर्स रिपोर्ट करत आहेत. ही समस्या आधीपेक्षा खूप मोठी आहे. यामुळे अनेक फाइल्स डिलीट होत आहेत. सावधान! WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Windows

    पुढील बातम्या