मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमचं Facebook Account दुसरं कोणी वापरत नाही ना? असं करा चेक

तुमचं Facebook Account दुसरं कोणी वापरत नाही ना? असं करा चेक

फेसबुकसाठी फक्त युजरनेम आणि पासवर्ड असला की कुठेही वापरू शकतो. त्यामुळे याची सुरक्षितता महत्वाची आहे.

फेसबुकसाठी फक्त युजरनेम आणि पासवर्ड असला की कुठेही वापरू शकतो. त्यामुळे याची सुरक्षितता महत्वाची आहे.

फेसबुकसाठी फक्त युजरनेम आणि पासवर्ड असला की कुठेही वापरू शकतो. त्यामुळे याची सुरक्षितता महत्वाची आहे.

  • Published by:  Suraj Yadav

फेसबुक हे असं सोशल मीडिया अॅप आहे जे सर्वाधिक वापरलं जातं. फेसबुक, व्हॉटस्अॅप यांचा वापर करण्याचं प्रमाण मोठं आहे. व्हॉटसअॅप फक्त ज्या मोबाईलमध्ये सुरु आहे त्यातच वापरता येतं किंवा तो मोबाईल आपल्याजवळ असल्यास वेब व्हॉटसअॅपच्या मदतीने कॉम्प्युटरवर वापरू शकतो. फेसबुकसाठी फक्त युजरनेम आणि पासवर्ड असला की कुठेही वापरू शकतो. त्यामुळे याची सुरक्षितता महत्वाची आहे. अनेकदा आपण जिथं फेसबुक वापरतो तिथं लॉग आउट न करता तसंच ठेवतो किंवा पासवर्ड सेव्ह करतो. यामुळे तो दुसऱं कोणीही वापरण्याची शक्यता असते.

तुमचे फेसबुक इतर कोणत्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर लॉग इन आहे हे तुम्ही चेक करू शकता. तसंच ते लॉगआऊटही करता येतं. यासाठी तुमच्या मोबाईलवर फेसबुक ओपन करून काही सेटिंग बदलावे लागतील. त्यानंतर फेसबुक कुठे सुरु आहे ते समजेल. तसंच ते लॉग आउटसुद्धा करता येईल.

- फेसबुक मोबाईलवर ओपन केल्यानंतर त्याच्या Settings मध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. त्यामध्ये ‘Security and Login’ असा पर्याय दिसेल. कॉम्प्युटरवर जर फेसबुक वापरत असाल तर हाच पर्याय डाव्या बाजुला दुसऱ्या क्रमांकावर दिसेल.

- ‘Security and Login’ यावर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्या पेजवर ‘Where You’re logged In’ असा ऑप्शन मिळेल. त्यावर तुमचे फेसबुक ओपन असलेल्या डिव्हाइसची यादी दिसेल.

- तुमचे फेसबुक कोणत्या डिव्हाइसवर सुरु आहे हे तर दिसेलच पण त्याचसोबत कधी पाहिले गेले तेसुद्धा दिसेल. तुमचे फेसबुक किती वाजता पाहिले गेले आणि कधी लॉग इन केलं याची माहिती मिळेल.

हे वाचा : WhatsApp च्या या ट्रिक्स फोन मेमरी वाचवतील आणि चॅटसुद्धा करता येईल सेव्ह

- लॉगइन असलेल्या डिव्हाइसच्या लिस्टसमोर तीन डॉट आहेत. त्यावर क्लिक केल्यानंतर लॉग आऊट असा पर्याय मिळेल. तुम्हाला जर सगळ्याच डिव्हाइसमधून लॉग आऊट करायचं असेल तर सर्वात खाली  ‘Log Out of all Session’ असा पर्याय दिसेल. तो क्लिक करताच तुमचे इतर ठिकाणी सुरु असलेले फेसबुक लॉग आऊट होईल.

हे वाचा : WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी! अखेर तुमची काळजी घेणारं फीचर आलं, असा करा वापर

First published:

Tags: Facebook