मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी! अखेर तुमची काळजी घेणारं फीचर आलं, असा करा वापर

WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी! अखेर तुमची काळजी घेणारं फीचर आलं, असा करा वापर

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

Whatsapp आत्तापर्यंतचं सर्वात मोठं फीचर यूजर्सकरता घेऊन आलं आहे. यामुळे यूजर्सना अनेक फायदे होणार आहेत.

मुंबई, 04 मार्च: व्हॉटसअ‍ॅप यूजर्सना सगळ्यात मोठी खुशखबर आहेत. तुम्ही ज्या फीचरची वाट पाहत होतात. ते फीचर आता आलं आहे. व्हॉटसअ‍ॅपने अ‍ॅंड्रॉइड आणि Ios या दोन्ही यूजर्ससाठी  हे नवं फीचर आणलं आहे. अनेकदा यूजर्सनी या फीचरची मागणी केली होती. अखेरीस ते नवं फीचर आता यूजर्सना वापरता येणार आहे.व्हॉटसअ‍ॅपने आपल्या ब्लॉग पेजवर याविषयी माहिती दिली आहे.

अ‍ॅंड्रॉइड आणि Ios या दोन्ही यूजर्ससाठी 'डार्क मोड' हे फीचर व्हॉटसअ‍ॅपने आणलं आहे.‘आम्हाला सांगायला आनंद होतो आहे,की व्हॉटसअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी डार्क मोड हे फीचर घेऊन आलं आहे.’ अशी माहीती देत व्हॉटसअ‍ॅपने आपल्या ब्लॉग पेजवर या नव्या फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर तुमच्या मोबाईलवर अॅक्टिवेट करण्याआधी तुम्हा अॅप अपडेट करावं लागेल. अद्याप तरी सर्वच डिव्हाइसला अपडेट आलेले नाहीत.

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉटस्अॅपने अखेर डार्क मोड फीचर सुरू केलं आहे. व्हॉटस्अॅपचं हे फीचर थिम सिलेक्शन पर्यायात दिसत आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या व्हॉटस्अॅपचा रंग पूर्ण बदलेल. अॅपचा युजर इंटरफेस डार्क ग्रीन रंगात दिसेल. चॅट करताना तुम्हाला बॅकग्राउंडमध्ये हवा असलेला कलर आणि डार्क मोड करता येईल. रात्री अंधारात डोळ्यांना जास्त प्रकाश हानीकारक असतो. अशावेळी डार्क मोड वापरणं फायद्याचं ठरतं.

इतर बातम्या:सावधान! तुमच्या Whatsapp ची माहिती होऊ शकते लीक, Whatsapp वापरताना 'हे' टाळा

असे अॅक्टिवेट करा डार्क मोड फीचर

व्हॉटस्अॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करा. त्याच्या टॉपला राइट कॉर्नरवर असलेल्या मेन्यू आयकॉनवर क्लिक करा. त्यानतंर सेटिंगमध्ये जाऊन चॅट हा पर्याय निवडा. त्याठिकाणी Theme पर्याय दिसेल. त्यामधील डार्क मोड सिलेक्ट करताच तुमच्या व्हॉटसअॅपचा रंग बदलेल.

इतर बातम्या:OPPO चा नवा Reno 3 Pro स्मार्टफोन भारतात लॉंच, भन्नाट सेल्फी कॅमेरा हेच आहे खास

First published:

Tags: App, Dark mode, Technology, Web, Whatsapp