मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp च्या या ट्रिक्स फोन मेमरी वाचवतील आणि चॅटसुद्धा करता येईल सेव्ह

WhatsApp च्या या ट्रिक्स फोन मेमरी वाचवतील आणि चॅटसुद्धा करता येईल सेव्ह

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

कोरना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगच थांबल्यासारखं झालं आहे. अनेक लोक घरी राहूनच ऑफिसचं काम घरी राहून करत आहेत. त्यामुळे सध्या WhatsApp चा वापर खूप वाढला आहे.

फोटो पाठवताना कमी रिझोल्यूशनमध्ये सेंड होत असतील, पर्सनल चॅट सेव्ह करायचं आहे किंवा मीडिया डाउनलोड झाल्याने मेमरी फुल्ल होत असेल तर या ट्रिक्स वापरा.

मुंबई, 07 मार्च : सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅप अनेक नवीन फीचर्स अपडेट करत आहे. नुकतंच व्हॉटसअॅपने डार्क मोड फीचर अपडेट केलं. यामुळे युजर्सनच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. याशिवाय अनेक युजर फ्रेंडली फीचर्स कंपनीने दिली आहेत. चॅटिंगसह, ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग, डॉक्युमेंट पाठवण्यासाठी याचा वापर होत आहे. कॅमेऱ्याने हाय क्वालिटी काढलेले फोटो स्टेटसला ठेवल्यानंतर आहे त्याच रिझोल्यूशनमध्येच दिसत नाहीत.

व्हॉटसअॅपवर कोणी पाठवला तर त्याची साइज बदलते. त्याची क्वालिटी कमी होते. मात्र व्हॉटस्अॅपमध्ये एक खास फीचर आहे ज्यामुळे तुम्हाला आहे त्या साइजमध्ये फोटो पाठवता येतात.

चॅटिंग करत असताना फोटो सेंड करण्यासाठी पर्याय निवडतो त्यावेळी अटॅचमेंटमध्ये डॉक्युमेंट असा एका पर्याय आहे. त्यावरून तुम्हाला फोटो, व्हिडिओ आहे त्या साइजमध्ये पाठवता येतात.

व्हॉटसअॅप ओपन केल्यानंतर टॉपला उजव्या बाजुला तीन डॉटवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंगमधून चॅटवर जाऊन क्लिक केल्यानंतर मीडिया व्हिजिबिलिटी पर्याय दिसेल. त्यावर ऑफ केल्यानंतर तुम्हाला एखाद्याने पाठवलेले फोटो, व्हिडिओ डाउनलोड होणार नाहीत. तुम्ही क्लिक केल्यानंतर सर्व फाइल डाउनलोड होतील.

चॅट करा सेव्ह

तुमचं व्हॉटसअॅप चॅट कोणालाही पाठवता येतं. एखादं महत्वाचं चॅटिंग असेल तर तुम्ही जीमेल अकाउंटवर पाठवून सेव्ह करू शकता. यासाठी व्हॉटसअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन चॅट हिस्ट्रिमध्ये देण्यात आलेल्या एक्स्पोर्ट चॅट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर जे चॅट एक्स्पोर्ट करायचं आहे त्याचा नंबर सिलेक्ट करून इमेलवर सेव्ह करा. त्यासोबत पाठवलेल्य मीडिया फाइल्ससुद्धा मेलवर सेव्ह करायच्या की नाही हेदेखील निवडता येतं.

हे वाचा : WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी! अखेर तुमची काळजी घेणारं फीचर आलं, असा करा वापर

First published:

Tags: Whatsapp