जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 19 वर्षीय तरुणामुळे Elon Musk यांची डोकेदुखी वाढली, पैशांची ऑफरही नाकारली; काय आहे नेमकं प्रकरण?

19 वर्षीय तरुणामुळे Elon Musk यांची डोकेदुखी वाढली, पैशांची ऑफरही नाकारली; काय आहे नेमकं प्रकरण?

19 वर्षीय तरुणामुळे Elon Musk यांची डोकेदुखी वाढली, पैशांची ऑफरही नाकारली; काय आहे नेमकं प्रकरण?

जॅक स्वीनीने ElonJet नावाने ट्विटर अकाउंट सुरु केले आहे. तसेच, इलॉन मस्क यांच्या फ्लाईट्सवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एक बॉट विकसित केला आहे. या अकाऊंटवरुन मस्क यांच्या विमानाच्या प्रत्येक हालचालीची माहिती देण्यात येते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जानेवारी : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी Tesla चे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, त्यांची कंपनी टेक्नोलॉजीमध्ये एक नावाजलेली कंपनी. मात्र एवढं असूनही टेक्नोलॉजीच्या बळावर अमेरिकेतील एका 19 वर्षांच्या मुलाने जगातील सर्वात श्रीमंत इलॉन मस्क यांची डोकेदुखी वाढवली आहे. जगभरात हजारो कोटींच्या डील करणारे इलॉम मस्क या तरुणासोबत छोटी डील अद्याप फायनल करु शकले नाहीत. जॅक स्वीनी असे या फ्लोरिडा येथे राहणाऱ्या मुलाचे नाव आहे. तर झालं असं, अमेरिकेतील तरुण जॅक स्वीनी इलॉन मस्क यांच्या वैयक्तिक विमानाचा मागोवा घेणारे ट्विटर खाते सांभाळतो. त्याचे ट्विटरवर 150,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी इलॉन मस्क यांनी त्याला 5000 डॉलरची ऑफर केली होती, पण त्याने ती नाकारली आहे. नवभारत टाईम्स ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. जॅकने ElonJet नावाने ट्विटर अकाउंट सुरु केले आहे. तसेच, इलॉन मस्क यांच्या फ्लाईट्सवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी एक बॉट विकसित केला आहे. या अकाऊंटवरुन मस्क यांच्या विमानाच्या प्रत्येक हालचालीची माहिती देण्यात येते. जसे की विमान कुठे टेक ऑफ झाले, कुठे उतरले आणि या प्रवासासाठी किती वेळ लागला इत्यादी सर्व माहिती इथे दिली जाते. Budget expectations: बाइक किंवा स्कूटर खरेदीचा विचार आहे? स्वस्त होऊ शकतात वाहन दर जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यावरही नजर जॅक स्वीनीने आणखी डझनभर बॉट्स विकसित केले आहेत जे MicroSoft चे बिल गेट्स आणि Amazon चे जेफ बेझोस यांसारख्या हाय-प्रोफाइल बॉट्सच्या हालचालींचा मागोवा घेतात. गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी मस्कने स्वीनीला अकाऊंट हटवण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. मस्क यांनी त्याला 5,000 डॉलर देण्याची ऑफर दिली जेणेकरून त्यांच्या फ्लाईटचा मागोवा घेऊ शकत नाही. पण स्वीनीने ऑफर नाकारली आणि 50,000 डॉलरची मागणी केली. स्वीनीने म्हटलं की, याचा वापर ते कॉलेज आणि टेस्लाच्या मॉडेल 3 साठी वापरू शकतात. मात्र ही आयडिया मला आवडली नसल्याचे मस्क यांनी सांगितले. 1000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे 24W Dolby साउंड असणारा Realme चा Smart TV, मिळतील 7 डिस्प्ले मोड मुलाची मागणी काय आहे? मस्क आणि स्वीनी यांनी 19 जानेवारी रोजी ट्विटरवर शेवटचे बोलणे झाले. मस्क म्हणाले की, त्याचे ट्विटर अकाऊंट काढून टाकण्यासाठी पैसे मागणे ही चांगली गोष्ट नाही. यावर स्वीनी म्हणाला की इंटर्नशिपसारख्या इतर पर्यायांसह हे करणे सोपे होईल. मात्र मस्क यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. स्वीनी म्हणतो की तो SpaceX चा चाहता आहे. त्याचे वडील विमान कंपनीत काम करायचे आणि त्यामुळेच त्याला एविएशनमध्ये इंटरेस्ट वाढला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात