मुंबई, 30 जानेवारी: सध्याच्या काळात प्रगत अशा स्मार्ट टीव्हीला (Smart TV) विशेष मागणी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे (OTT Platform) ग्राहक स्मार्ट टीव्ही खरेदीला विशेष प्राधान्य देताना दिसतात. आज बाजारात विविध कंपन्यांचे वैशिष्टयपूर्ण असे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. फीचर्सनुसार त्यांच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत. अनेक कंपन्या स्मार्ट टीव्हीच्या ऑनलाइन खरेदीवर डिस्काउंट देत आहेत. रिअलमी कंपनीने देखील त्यांच्या 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर विशेष डिस्काउंट ऑफर केले आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असलेला हा स्मार्ट टीव्ही ग्राहकांना नक्कीच पसंत पडेल, असा आहे. रिअलमीने (Realme) त्यांच्या वेबसाईटवर स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही भरघोस सवलतीत उपलब्ध करून दिले आहेत. Realme.com कडून मिळालेल्या माहितीनुसार, 32 इंची Realme Smart Tv वर देखील डिस्काउंट देण्यात येत आहे. खास ऑफरमध्ये हा टीव्ही 15,899 रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत चालणाऱ्या या ऑफर अंतर्गत ग्राहकांना या स्मार्ट टीव्हीवर 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तुम्ही हा 32 इंचाचा टीव्ही अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकता. टीव्हीवर नेमक्या कोणत्या ऑफर्स (Offers) मिळत आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याविषयी आता जाणून घेऊया. हे वाचा- फिजिकल SIM कार्डशिवाय लाँच होणार Apple iPhone 14, वाचा काय आहे हे e-SIM? रिअलमीचा 32 इंच स्मार्ट टीव्ही HD तर रिअलमीचा 43 इंच स्मार्ट टीव्ही FHD आहे. रिअलमी स्मार्ट टीव्हीमध्ये 8.7mm चा अतिशय स्लीम बेझल देण्यात आला आहे. रिअलमीचा स्मार्ट टीव्ही हा अँड्रॉइड टीव्ही (Android TV) सॉफ्टवेअरवर चालतो. यात व्हॉईस आणि नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video), तसेच गुगल असिस्टंटसाठी (Google Assistant) हॉट किज (Hot Keys) देखील देण्यात आल्या आहेत. कनेक्टिव्हिटीचा विचार करायचा झाला तर या टीव्हीत तुम्हाला 3 HDMI, 2USB , एक लॅन (LAN), डिजिटल ऑडिओ आऊट आणि ब्लूटुथ 5.0 मिळेल. रिअलमीचा हा स्मार्ट टीव्ही क्रोम बूस्ट पिक्चर इंजिन तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. यात 7 डिस्प्ले मोड असतील आणि 400 युनिटसपर्यंत पीक ब्राईटनेस (Peak brightness) मिळेल. विशेष म्हणजे रिअलमीचे युजर्स या स्मार्ट टीव्हीवर HDR 10 कंटेंट देखील पाहू शकतील. 24 W Dolby साउंड सुविधा या स्मार्ट टीव्हीत 24w आउटपूटचा क्वाड कोर स्पीकर आहे. हा स्पीकर डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीत 1GB रॅम आणि 8GB स्टोरेजसह मीडियाटेक प्रोसेसरही (Mediatek Processer) देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.