नवी दिल्ली, 31 जानेवारी : 1 फेब्रुवारी रोजी बजेट 2022-23 (Budget 2022-23) सादर होणार आहे. यावर्षी बजेटमध्ये काय मिळणार, काय घोषणा होणार अशी सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेषत: ऑटो इंडस्ट्रीला या बजेटमधून अधिक आशा आहेत. जर तुम्ही स्कूटर-बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या बजेटमध्ये ऑटो सेक्टरशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. GST दरात कमीची मागणी - ऑटो डिलर्स संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (FADA) Two Wheeler वर GST दर 28 टक्क्यांनी कमी करुन 18 टक्के करण्याची मागणी केली आहे, जेणेकरुन मागणीत वाढ होऊ शकेल. FADA ने टू-व्हीलर हे लक्जरी प्रोडक्ट (Luxury Product) नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे जीएसटी (GST) दर कमी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हे वाचा - काय आहे FAME-II सबसिडी, कसा मिळतो Electric Vehicle खरेदीवर बंपर फायदा
FADA ने टू-व्हीलर ही चैनीची वस्तू म्हणून वापरली जात नसल्याचं म्हटलं आहे. सर्वसामान्य दैनंदिन कामासाठी, ऑफिसला जाण्यासाठी याचा वापर करतात. त्यामुळे 28 टक्के जीएसटी जो लक्जरी प्रोडक्टवर लावला जातो, तो टू-व्हीलरसाठी लावणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टू-व्हीलरवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्याची मागणी केली आहे. देशातील 15000 हून अधिक ऑटोमोबाइल डिलर्सचं (Automobiles Dealer) प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा FADA कडून करण्यात आला आहे. FADA कडे सध्या 26,500 डिलरशिप आहेत.
हे वाचा - Ola-Uber Apps मध्ये देताय तुमची वैयक्तिक माहिती? यामुळे बसेल मोठा फटका
RoDTEP दर वाढवण्याची मागणी - भारतीय ञटो कंपोनेंट इंडस्ट्रीतील मोठ्या असोसिएशनपैकी एक ऑटोमोटिव कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात एसीएमए (ACMA) केंद्रीय बजेटसाठी सरकारला केलेल्या त्यांच्या शिफारशींमध्ये सर्व ऑटो पार्ट्सवर 18 टक्के एकसमान जीएसटी दर लावण्याची मागणी करत आहे. सरकारकडून रिसर्च आणि विकास यात गुंतवणूक वाढवण्यासाठी एक्सपोर्ट प्रोडक्टवर अर्थात निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सूट म्हणजेच RoDTEP दर वाढवण्यासही त्यांनी सरकारला म्हणलं आहे.