नवी दिल्ली, 3 मार्च : सॅमसंगने
(Samsung) भारतात आपल्या A-सीरीजचा नवा स्मार्टफोन गॅलेक्सी A32
(Samsung Galaxy A32) लाँच केला आहे. गॅलेक्सी A32 या वर्षात लाँच होणारा या सीरीजचा दुसरा स्मार्टफोन आहे. कंपनीने हा फोन एकाच वेरिएंटमध्ये 6GB RAM आणि 128GB लाँच केला आहे. Samsung Galaxy A32 च्या या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. हा फोन Awesome Violet, Awesome black, Awesome Blue आणि Awesome White रंगात खरेदी करता येणार आहे.
Samsung Galaxy A32 फोन 1035.56 रुपयांच्या EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. तसंच कंपनी पेटीएम वॉलेटद्वारे पहिल्या ट्रान्झक्शनवर 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही मिळतो आहे.
Samsung Galaxy A32 फीचर्स -
- 6.4 इंची Infinity-U फुल HD+ सुपर एमोलेड डिस्प्ले
- 90 Hz रिफ्रेश रेट
- 6GB RAM आणि 128GB
- माइक्रोएसडी कार्ड स्लॉट
- फोन स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो.
- Samsung Knox प्रोटेक्शन
- ऑन-स्क्रिन फिंगरप्रिंट सेन्सर
- 5000 mAh बॅटरी
- 15W एडॉप्टिव फास्ट चार्जिंग सपोर्ट
क्वॉड कॅमेरा सेटअप -
A32 या स्मार्टफोनला रियर क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा मेन कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. त्याशिवाय बॅकला 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.