मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या जागी आता Eco-Friendly बॉटल, स्टार्टअप कंपनीची अनोखी कल्पना

पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या जागी आता Eco-Friendly बॉटल, स्टार्टअप कंपनीची अनोखी कल्पना

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 6 जुलै: संपूर्ण जगच प्लॅस्टिकच्या वाढत्या कचऱ्यामुळे (Plastic Waste) चिंतेत आहे. वापर केल्यानंतर जे प्लॅस्टिक आपण टाकून देतो, त्याचा अधिकांश भाग रिसायकल (Recycle) होत नाही. हेच पाहता हैदराबादध्ये प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर उपाय म्हणून एक स्टार्टअप Caro Water ने पुढाकार घेतला आहे. त्यांनी पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या जागी इको-फ्रेंडली बॉटल (Eco Friendly Bottle) आणल्या आहेत.

हैदराबादमधील दोन तंत्रज्ञ सुनीथ तातिनेनी (Suneeth Tatineni) आणि चैतन्य अयिनपुडी (Chaitanya Ayinapudi) यांनी प्लॅस्टिक कचरा कमी करण्याच्या उद्देशाने स्टार्टअप Caro Water लाँच केलं आहे, याचा अर्थ प्रिय पाणी असा होतो. हे स्टार्टअप सुरू करण्यासाठी या दोघांनीही आपली कॉर्पोरेट नोकरी सोडली.

सुनीथ तातिनेनी यांनी सांगितलं, की एक व्यक्ती जो दूरचा प्रवास करतो, तो कमीत-कमी एक लीटर पाण्याच्या पाच बॉटल खरेदी करेल. या प्लॅस्टिकच्या बॉटल 10 टक्क्यांहूनही कमी रिसायकल होतात. हा एक गंभीर मुद्दा आहे. याच गंभीर बाबीवर उपाय शोधण्यासाठी आम्ही कार्डबोर्ड बॉक्सचा वापर करुन पाणी पॅक करणं सुरू केलं. यात पाणी बॅग-इन-बॉक्स पिशव्यांमध्ये भरलं जातं.

इको-फ्रेंडली बॉक्स आणि बॅग -

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉक्स आणि बॅग इको-फ्रेंडली आहेत, ज्यांना रिसायकल केलं जाईल. त्यांनी हैदराबादध्ये काही रिसायकलिंग युनिटसह करारही केला आहे, जेणेकरुन यापैकी एकही बॉटल वाया जाऊ नये. तसंच रिसायकल कार्डबोर्ड आणि याच्या आत लावण्यात आलेल्या वॉटर बॅगचा इतर गोष्टींसाठीही वापर होईल. या बॉटल 5 आाणि 20 लीटरच्या दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. 5 लीटर बॉटलची किंमत 75 रुपये, तर 20 लीटर बॉटलची किंमत 120 रुपये आहे.

(वाचा - 13 MP कॅमेरा असलेलं जगातलं पहिलं स्मार्टवॉच झालं लाँच; 5 हजार रुपयांचा डिस्काउंट)

कंपनीचे संस्थापक चैतन्य यांनी सांगितलं, की इको-फ्रेंडली बॉटलमध्ये पाणी सप्लाय करण्याचा हा देशातील अनोखा आणि पहिलाच प्रयत्न आहे. सुरुवातीनंतर मागील 6 महिन्यात 20 लीटरच्या जवळपास 8000 पाण्याच्या बॉटलची विक्री झाली आहे. रुग्णालयं, हॉटेल आणि छोट्या स्तरावरील पार्टीजवर अधिक लक्षकेंद्रीत करण्यात आलं आहे, जिथे नेहमी प्लॅस्टिकच्या कचऱ्याचा ढीग असतो. हैदराबादध्ये आता काही हॉटेल आणि रुग्णालयं पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटलऐवजी या बॉटलचा वापर करत आहेत.

First published:

Tags: Drink water, Plastic, Startup, Tech news, Technology