नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : खगोलशास्त्रज्ञांना दूरच्या वस्तूंमधून येणाऱ्या प्रकाशाद्वारे विश्वाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. कारण तो प्रकाश एखाद्या घटनेवेळी सुरू होतो आणि त्यानंतर पृथ्वीपर्यंत पोहोचतो. यामुळेच आपल्याला प्रगत दुर्बिणीद्वारे अब्जावधी वर्षं जुन्या घटनांची माहिती मिळते. अलीकडेच हबल अंतराळ दुर्बिणीनं गुरुत्वीय लेन्सिंगद्वारे 11 अब्ज वर्षं जुन्या सुपरनोव्हाची छायाचित्रं घेतली आहेत. एबेल 370 गॅलेक्सी क्लस्टरमध्ये सापडलेला सुपरनोव्हा अर्थात चमकणारा तारा हा आतापर्यंत सापडलेला सर्वांत जुना सुपरनोव्हा आहे.
तीन वेगवेगळी छायाचित्रं
वास्तविक या छायाचित्रांमधून तीन वेगवेगळ्या कालावधींची क्रमवार माहिती मिळत आहे. हा कालावधी एक आठवड्यापर्यंत अस्पष्ट होण्याच्या प्रक्रियेतून गेला. या सुपरनोव्हाचा हा कमकुवत प्रकाश गॅलेक्सी क्लस्टर एबेल 370 च्या मागच्या भागातून येताना दिसला. मार्गात येणाऱ्या वस्तूंच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे दूरवरून येणारा प्रकाश आपली दिशा बदलतो आणि त्यामुळे ती वस्तू खूप मोठ्या स्वरूपात दिसते. या प्रभावाला ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग असं म्हणतात.
एका वेळी तीन छायाचित्रं कशी?
खगोलशास्त्रज्ञांसाठी चांगली गोष्ट म्हणजे या येणाऱ्या प्रकाशातून सुपरनोव्हाची तीन छायाचित्रं मिळाली. यामध्ये सुपरनोव्हाची वेगवेगळ्या वेळची स्थिती हबलला एकाच वेळी टिपता आली. यामध्ये एक संकेत असा, की फायरबॉल असलेल्या सुपरनोव्हाची थंड होताना थोड्या वेगळ्या रंगांमध्ये चित्रं दिसली. ही छायाचित्रं वेगवेगळ्या वेळी आली. कारण त्याच्या प्रकाशाने कापलेलं अंतर वेगवेगळं होतं.
विश्वाच्या सुरुवातीची छायाचित्रं
नासाच्या या हबल अंतराळ दुर्बिणीने अशा प्रकारे तीन वेगवेगळे क्षण एकाच छायाचित्रात टिपले आहेत. सुमारे 11 अब्ज वर्षांपूर्वी या ताऱ्याचा स्फोट झाला होता. विश्वाच्या सध्याच्या 13.8 अब्ज वर्षांच्या वयाचा हा पाचवा भाग होता. खरं तर हे विश्वाच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या पहिल्या मोठ्या सुपरनोव्हाचं छायाचित्र आहे.
दुर्मीळ छायाचित्रं
हे संशोधन शास्त्रज्ञांना ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळात तारे आणि आकाशगंगा यांच्या निर्मितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. या सुपरनोव्हाची छायाचित्रं खास आहेत. कारण ही छायाचित्रं ताऱ्याच्या स्फोटाच्या सुरुवातीच्या टप्प्यातली आहेत. ``सुपरनोव्हा त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत दिसणं फारच दुर्मीळ आहे. कारण हा टप्पा खूपच लहान असतो,`` असं या अभ्यासाचे पहिले लेखक वेनलेई चेन यांनी सांगितलं.
हे वाचा - ‘या’ दिवशी लाँच होणार देशातील सर्वात स्वस्त Electric Car, बजेटमध्ये तगडी फीचर्स
ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगच्या माध्यमातून
सुपरनोव्हाच्या प्रक्रियेचा प्रारंभिक टप्पा काही तासांपासून काही दिवसांपर्यंत असतो. जवळून पाहिल्यानंतरही ही घटना स्पष्टपणे दिसतेच असं नाही. या घटनेत संशोधकांना सुपरनोव्हाचे अनेक टप्पे पाहायला मिळाले. अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताद्वारे प्रथम वर्णन केलेल्या ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगच्या घटनेच्या माध्यमातून या घटनेचं निरीक्षण करणं शक्य झालं.
हे वाचा - अँड्रॉइड डिव्हाइसवरचे डिलीट केलेले मेसेज परत मिळवता येतात का?
या कारणामुळे तीन छायाचित्रं एका वेळी टिपता आली
सुपरनोव्हाची ही घटना एबेल 370 गॅलेक्सी क्लस्टरच्या मागून येणाऱ्या प्रकाशामुळे दृष्टिक्षेपात आली. या क्लस्टरच्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे एबेल 370 ने एक प्रकारच्या खगोलीय लेन्सप्रमाणे काम केलं. त्यामुळे सुपरनोव्हाच्या प्रकाशाचा मार्ग बदलला आणि तो मोठा दिसू लागला. या कारणास्तव, या स्फोटाची अनेक चित्रं एकाच छायाचित्रात पाहायला मिळाली. ती एकाच वेळी हबल दुर्बिणीने कॅप्चर केली होती. या छायाचित्रांमधले वेगवेगळे रंग सुपरनोव्हाच्या तापमानाची माहिती देतात. सुरुवातीला याचा रंग निळा दिसला आणि थंड झाल्यावर याचा रंग लाल होताना दिसून आला. या छायाचित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये सुपरनोव्हाची सुरुवातीची अवस्था आणि अतिशय जुनी घटना अशा दोन्हींचा समावेश होतो. त्याचवेळी खगोलशास्त्रज्ञ प्रथमच विश्वाच्या सुरुवातीच्या काळात मृत होत असलेल्या ताऱ्याचा आकार मोजू शकले. हा तारा आपल्या सूर्याच्या तुलनेत 500 पटींनी मोठा होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.