मुंबई, 10 नोव्हेंबर : जगभरात विविध मेसिजिंग अॅप्स वापरली जातात. त्यात व्हॉट्सअॅपचा वापर नक्कीच मोठ्या प्रमाणावर होतो. परंतु, आजही अनेक महत्त्वाच्या मेसेजेसची देवाणघेवाण टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात होते. बॅंकांकडून, ई कॉमर्स कंपन्यांकडून टेक्स्ट मेसेजेस पाठवले जातात. अगदी ओटीपीसुद्धा टेक्स्ट मेसेजच्या रूपातच पाठवले जातात. वैयक्तिक संवादासाठीही अनेक जण टेक्स्ट मेसेजचा वापर करतात. एखाद्या वेळी गडबडीत काही महत्त्वाचे मेसेजेस डिलीट होतात किंवा केले जातात. असे डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करणं अवघड असतं. कारण, अँड्रॉइड फोनवरचे डिलीट झालेले मेसेजेस तात्पुरत्या स्वरूपात कुठेच स्टोअर केले जात नाहीत. त्यासाठी ट्रॅश बीनची सोयही अँड्रॉइड फोनमध्ये नसते. त्यामुळे कोणताही मेसेज डिलीट होतो, तेव्हा तो डिव्हाइसमधून कायमस्वरूपी निघून जातो.
परंतु, त्यात एखादा महत्त्वाचा मेसेज डिलीट झाला असेल, तर काय? काही छोट्या टिप्सच्या साह्याने डिलीट केलेले मेसेजेस रिकव्हर करणं शक्य आहे; पण त्याला काही मर्यादा आहेत. त्यातून सगळे मेसेज रिकव्हर करता येतील असं नाही किंवा त्याची खात्री देता येत नाही. तरीही त्यासाठीच्या काही टिप्स जाणून घेऊ या.
हे ही वाचा : इन्कम टॅक्स रिटर्न भरणं होणार सोपं? काय आहे सरकारचा कॉमन आयटीआर प्रस्ताव
रिकव्हरी सॉफ्टवेअर
फोनमधला टेक्स्ट मेसेज डिलीट झाला आहे आणि तो रिकव्हर करायचा आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर आधी फोन बंद करा. कारण, मेसेज डिलीट केल्यानंतर जे काही केलं जातं, त्यामुळे तो डिलीट झालेला मेसेज करप्ट होण्याची शक्यता असते. अशा वेळेस एक तर फोन स्विच ऑफ करावा किंवा एअरप्लेन मोडवर टाकावा. त्यानंतर डेटा रिकव्हरी प्रोग्राम इन्स्टॉल करा. त्यानंतर मेसेज रिकव्हर झालाय का नाही हे पडताळून पाहू शकता.
गुगल बॅकअप
अनेक अँड्रॉइड फोन्समध्ये गुगलवर ऑटोमॅटिकली बॅकअप घेण्याची सोय असते. जर तुमचा फोनही ऑटोमॅटिकली गुगल बॅकअप घेत असेल, तर तुम्ही डिलीट झालेले मेसेजेस त्याद्वारे रिकव्हर करू शकता.
पण हा एक न्यूक्लिअर ऑप्शन आहे. यासाठी फोनची फॅक्टरी सेटिंग्ज रिसेट करणं गरजेचं असतं. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण फोनचा बॅकअप रिकव्हर करता येतो. या सगळ्या रिसेट प्रक्रियेला खूप वेळ लागतो. शिवाय जो बॅकअप रिकव्हर करता असता, त्यात काही डेटाचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे ही वाचा : प्रॉपर्टी विकून पैसे कमवल्यास टॅक्स नियम काय असतील? जाणून घ्या
मेसेज रिकव्हर करण्याचे अन्य उपाय
मेसेज रिकव्हर करण्याचे विविध मार्ग आहेत. ज्या व्यक्तीकडून मेसेज आला आहे त्या व्यक्तीशी संपर्क साधावा. तसंच त्या व्यक्तीला तुमच्याकडचा डिलीट झालेला मेसेज पुन्हा शेअर करायला सांगावा. याशिवाय, तुमच्या फोनमधल्या इतर अॅप्सचा आधार घ्यावा, ज्यात तुमचे मेसेजेस कॅप्चर झालेले असू शकतात.