मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Driving Licence काढण्याच्या नियमांमध्ये बदल; केवळ याच पद्धतीने अर्ज करता येणार

Driving Licence काढण्याच्या नियमांमध्ये बदल; केवळ याच पद्धतीने अर्ज करता येणार

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने लायसन्स काढण्याच्या आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहेत. डिजिटल इंडियाचा भाग म्हणून यापुढे लायसन्स काढण्याच्या विविध प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने लायसन्स काढण्याच्या आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहेत. डिजिटल इंडियाचा भाग म्हणून यापुढे लायसन्स काढण्याच्या विविध प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत.

केंद्रीय परिवहन मंत्रालयाने लायसन्स काढण्याच्या आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहेत. डिजिटल इंडियाचा भाग म्हणून यापुढे लायसन्स काढण्याच्या विविध प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत.

नवी दिल्ली, 25 जानेवारी : वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) असणं गरजेचं आहे. परंतु या कोरोनाच्या काळात नागरिकांना आरटीओ कार्यालयात येणं शक्य होत नाही. यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने (Union Ministry of Transport) लायसन्स काढण्याच्या आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल केले आहेत. डिजिटल इंडियाचा (Digital India) भाग म्हणून यापुढे लायसन्स काढण्याच्या विविध प्रक्रिया ऑनलाईन होणार आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होणार असून अनेकांना घरबसल्या लायसन्स मिळवणं शक्य होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि झारखंड या राज्यांनी या सुविधेची सुरुवात केली आहे. यामुळे येथील नागरिकांना जास्तीतजास्त ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.

केवळ ऑनलाईन अर्ज -

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) काढण्यासाठी अनेक राज्यांमध्ये केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत. यापुढे आरटीओ कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जात आहेत. याचबरोबर अनेक विविध नियमांमध्ये आणि पद्धतींमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

(वाचा - कोरोना वॅक्सिनच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान; आधार-OTP शेअर करू नका)

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी स्टेप्स - 

- सर्वप्रथम parivahan.gov.in वेबसाईटवर जा

- त्यानंतर Driving License Related Services हा पर्याय निवडा.

- Apply Online बटनावर क्लिक करून त्यातील New Learners Licence पर्याय निवडा.

- यामध्ये विविध राज्यांच्या यादीमधून तुम्ही राहत असलेलं राज्य निवडा

Apply Driving Licence ओपन झाल्यानंतर यात विचारलेल्या माहिती बरोबर हवी असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील

(वाचा - PNB ग्राहकांसाठी बँकेची खास सुविधा; घरपोच मिळणार सेवा)

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी रक्कम भरण्याच्या पद्धतीत बदल -

लर्निंग लायसन्स (Learning license) काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लगेच ऑनलाईन पद्धतीने फी भरावी लागणार आहे. यानंतरच वेळचा स्लॉट मिळणार आहे. याचबरोबर ऑनलाईन परीक्षेची (Online Exam) तारीख देखील निवडू शकता. लर्निंग लायसन्सची परीक्षा पस झाल्यानंतर जिल्हा आरटीओ कार्यालयात ते मिळण्याची वाट पाहत बसण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील हे लायसन्स डाउनलोड करू शकता. यामुळे लाईनमध्ये वाट पाहत उभं राहण्याची गरज नाही.

First published:
top videos

    Tags: While driving