नवी दिल्ली, 25 जानेवारी : देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक PNB ने (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना डोरस्टेप बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. बँक स्वत:चं काही सुविधा घरी येऊन देणार आहे. त्यासाठी बँकेकडून एक App ही लाँच करण्यात आलं आहे. या App च्या मदतीने ग्राहक डोरस्टेप बँकिंगचा फायदा घेऊ शकतील. पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या डोरस्टेप बँकिंगमुळे ग्राहकांना जवळपास 12 सुविधा घरीच मिळणार आहेत. डोरस्टेप सेवा - चेक/ड्राफ्ट/पे-ऑर्डर फार्म 15G आणि 15H IT चालान स्वीकृति मुदत ठेव पावती TDS, फॉर्म 16 प्रमाण पत्र खात्याचा हिशोब गिफ्ट कार्ड रोख पैसे काढण्याची सेवा जीवन प्रमाणपत्र
(वाचा - तुम्हाला माहित आहे का की किती महत्त्वाचे आहेत क्रेडिट कार्ड स्टेटमेंट डिटेल्स? )
ग्राहक अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 18001037188 किंवा 18001213721 कॉल करू शकतात. त्याशिवाय अधिकृत वेबसाईट www.psbdsb.in वरही भेट देऊ शकता. त्याशिवाय DSB मोबाईल ऍपही डाउनलोड करू शकतात. - PNB ऑफिसमधून कॅश घेण्यासाठी आपल्या ग्राहकांना डोरस्टेप बँकिंग सेवा देत आहेत. - यात KYC प्रक्रियेचं पालन केलं जातं. - ग्राहकांना एक एनरॉलमेंट फॉर्म भरावा लागेल आणि सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ब्रांचसह एका एग्रीमेंटवर स्वाक्षरी करावी लागेल. - बँकेच्या कामकाजाच्या वेळेत घरातून किंवा कार्यालयातून रोख रक्कम जमा केली जाईल. ऑन कॉल पिक - बँकेचे कर्मचारी ग्राहकांच्या विनंतीनुसार, त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जातात, त्यांना टेलिफोन किंवा फॅक्सद्वारे बोलवलं जाऊ शकतं.
(वाचा - मोठी बातमी: आता 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोट चालणार नाही? RBI ने दिली माहिती )
बीट पिक अप - कॅश घेण्यासाठी बँकेचे कर्मचारी दररोज ग्राहकांच्या घरी किंवा कार्यालयात कॅश जमा करण्यासाठी जातात. पंजाब नॅशनल बँकेच्या डोरस्टेप बँकिंगसाठी ग्राहकांना ब्रांचमध्ये जाण्याची गरज नाही. त्याशिवाय यासाठी चार्जही कमी लागतो. सध्या SBI, PNB, union bank, BoB, BoI, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक आपल्या ग्राहकांना या ही सुविधा देत आहेत.