मुंबई, 21 जानेवारी : लोकांच्या गरजा किंवा उत्तम जीवनशैली लक्षात घेऊन स्मार्टफोनच्या (Smart phone) नवनवीन आवृत्त्या बाजारात येत असतात. लोकांमध्ये देखील स्मार्ट गॅजेट्सची (Gadget) क्रेझ वाढत आहे. नवीन स्मार्टफोन, आयपॅड किंवा टॅबलेट घेतल्यानंतर काही महिन्यांतच अपग्रेड केलेली आवृत्ती त्यांनी हवी असते. एकदा नवीन फोन घेतला की जुना फोन तसाच पडून राहतो. अशा स्थितीत जुन्या फोनचे काय करायचं असा प्रश्न पडतो. ज्याप्रमाणे स्मार्टफोनची खरेदी वाढत आहे, त्याच वेगाने घरांमध्ये जुन्या स्मार्टफोनची संख्याही वाढत आहे. बाजारात अनेक कंपन्या एक्सचेंज ऑफरचा पर्याय देतात. पण, अनेकांना आपले जुने फोन विकायची इच्छा नसते. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर जुन्या फोनचा कसा वापर करायचा हे आम्ही तुम्हाला सांगू.
कॉम्प्युटर रिमोट
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून तुमचा वैयक्तिक कॉम्प्युटर नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये 'युनिफाइड रिमोट अॅप' इन्स्टॉल करावे लागेल. त्याच्या मदतीने, तुमचा स्मार्टफोन तुमच्या संगणकावर नियंत्रण ठेवेल. याच्या मदतीने विंडोज, मॅक आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या पर्सनल कॉम्प्युटरवर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय फोनवरून कॉम्प्युटर ऍक्सेस करण्यासाठी तुम्ही 'क्रोम रिमोट डेस्कटॉप' देखील वापरू शकता. या अॅप्सच्या मदतीने तुम्ही फोनचा वापर वायरलेस कीबोर्ड, माउस, पीसीचे स्क्रीन मिररिंग आणि फाइल मॅनेजरसाठीही करू शकता.
युनिव्हर्सल रिमोट
तुमच्या जुन्या स्मार्टफोनमध्ये 'इन्फ्रारेड ब्लास्टर' असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही घरातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे नियंत्रित करू शकता. सॅमसंग आणि शाओमीच्या बहुतेक स्मार्टफोन्समध्ये IR ब्लास्टर इनबिल्ट आहे. एअर कंडिशनर, टीव्ही, म्युझिक सिस्टीम याशिवाय रिमोटला सपोर्ट करणारी इतर उपकरणेही या स्मार्टफोन्समधून नियंत्रित करता येतात. याशिवाय इतर काही अॅप्सच्या मदतीने तुम्ही एअर प्युरिफायर, अॅमेझॉन फायर स्टिक यांसारखे गॅजेट्सही नियंत्रित करू शकता.
OnePlus मोबाइलचा खिशात स्फोट; तरुणाच्या मांडीला दुखापत, सांगलीत एकच खळबळ
सुरक्षा कॅमेरा
स्मार्टफोनला सुरक्षा कॅमेरा म्हणून वापरण्यासाठी, तुमच्या फोनमध्ये IP Webcam आणि AtHome Camera इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. या अॅप्सच्या मदतीने फोनचा कॅमेरा इतर फोनवर व्हिडिओ स्ट्रीम करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तुमचा जुना कॅमेरा फोन घरातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवेल जे तुम्ही कुठेही बसून तुमच्या नवीन स्मार्टफोनवर पाहू शकता.
कार डॅशकॅम
स्मार्टफोनला कार डॅशकॅममध्ये रूपांतरित करण्यासाठी, तुमच्या जुन्या फोनमध्ये चांगली कॅमेरा गुणवत्ता असणे आवश्यक आहे. जुना फोन डॅशकॅम बनवण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमचा फोन कारमध्ये बसवावा लागेल. मग तुम्ही कुठेही जाल, फक्त स्मार्टफोन डॅशकॅम व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडवर ठेवा आणि तुम्ही कोणत्याही प्रवासाचे संपूर्ण रेकॉर्डिंग करू शकता.
पर्वताच्या टोकावर असं काय झालं की मुलाला कोसळलं रडू? Google वर Photo Viral
व्हिडिओ गेम प्लेयर
जुन्या स्मार्टफोनचा प्रोसेसर आणि बॅटरी चांगल्या स्थितीत असल्यास, गेमिंगसाठी वापरणे देखील एक चांगला पर्याय असू शकतो. यासाठी आधी तुम्हाला जुन्या फोनचा डेटा काढून टाकावा लागेल जेणेकरुन फोनमध्ये गेमिंगसाठी अधिक जागा तयार करता येईल. याशिवाय, गेमिंग आणखी मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही Apple Arcade किंवा Google च्या Stadia चे सदस्यत्व घेऊ शकता. आणि हे गेम प्रोजेक्टर किंवा टीव्ही सारख्या मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी तुम्ही Google Chromecast ची मदत घेऊ शकता.
ई-बुक रीडर किंवा ऑडिओबुक प्लेयर
आजकाल बरेच लोक हार्डकॉपी वाचण्याऐवजी ई-बुक्स वाचण्यास प्राधान्य देत आहेत. बहुतेक वाचक वाचण्यासाठी Amazon Kindle वरून ई-पुस्तके, वर्तमानपत्रे किंवा इतर डिजिटल माध्यम डाउनलोड करण्यास प्राधान्य देतात. याशिवाय 'गुगल प्ले बुक' किंवा 'ऑडिबल अॅप'वरून वाचण्याऐवजी तुम्ही ऑडिओ बुक्सही ऐकू शकता. अशा प्रकारे, तुम्ही जुना फोन फक्त वाचण्यासाठी किंवा शिकण्यासाठी समर्पित करू शकता. केवळ तुम्हीच नाही तर इतर सदस्य देखील सदस्यत्व घेतलेली सामग्री वाचण्यास सक्षम असतील.
वायरलेस हॉटस्पॉट
आजकाल, जवळजवळ प्रत्येक घरात वायर्ड किंवा वायरलेस इंटरनेट वायफायची सुविधा आहे. कोणत्याही परिस्थितीत वायफाय कनेक्शन मिळणे अवघड असेल, तर जुना स्मार्टफोन वायफायमध्ये बदलू शकता. यासाठी तुम्ही नवीन सिम किंवा नंबर घेऊ शकता, ज्यावर तुम्ही 3G/4G डेटा पॅक रिचार्ज करू शकता. फोनमध्ये नवीन सिम टाकल्यानंतर फोनचा हॉटस्पॉट ऑप्शन ऑन करा. यानंतर तुमचा जुना स्मार्टफोन वायरलेस वायफायमध्ये बदलला जाईल. अशा प्रकारे तुमचा जुना फोन अधिक चांगला वापरता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Phone, Smartphone