Home /News /technology /

पर्वताच्या टोकावर असं काय झालं की मुलाला कोसळलं रडू? Google वर Photo Viral

पर्वताच्या टोकावर असं काय झालं की मुलाला कोसळलं रडू? Google वर Photo Viral

Google Maps च्या मदतीमे तुम्ही अनोळखी ठिकाणचे फोटो घेऊ शकता, कोणत्याही ठिकाणच्या कोपऱ्यातील लाइव्ह फोटो तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे सोशल मीडियावर या फीचरच्या मदतीने घेतला गेलेला एक फोटो व्हायरल होतो आहे.

  नवी दिल्ली, 21 जानेवारी : सध्या गुगल (Google) जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग झाला आहे. काही माहिती हवी असल्यास, कुठे जायचं असल्यास Google ची प्रत्येक गोष्टीत मदत होते. गुगल मॅप्सच्या मदतीने तुम्ही कुठेही (Google Maps) अनोळखी ठिकाणीही फिरू शकता. गुगल ड्राइव्हवर (Google Drive) फोटो सेव्ह करू शकता आणि इतरही अनेक फीचर्स गुगलकडून दिले जातात. Google Maps च्या मदतीमे तुम्ही अनोळखी ठिकाणचे फोटो घेऊ शकता, कोणत्याही ठिकाणच्या कोपऱ्यातील लाइव्ह फोटो तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे सोशल मीडियावर या फीचरच्या मदतीने घेतला गेलेला एक फोटो व्हायरल होतो आहे. या व्हायरल फोटोमध्ये Google Maps वर एका व्यक्तीने अचानक कॅनडातील फॉसिल या पर्वतावर (Canada Fossil Mountain) एक मुलगा रडताना पाहिला. हे पाहून हा व्यक्ती हैराण झाला. हा व्यक्ती मॅप्सवर कॅनडातील या ठिकाणचं लोकेशन तपासत होता. त्याला याबाबत जराही कल्पना नव्हती, की अशाप्रकारे पर्वतावर त्याला कोणी दिसेल. हा फोटो 6 वर्षांपूर्वी बारबरा नावाच्या व्यक्तीने काढला होता. परंतु आता हा फोटो रेडिटवर शेअर केल्यानंतर व्हायरल झाला आहे.

  हे वाचा - खाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल!

  या फोटोबाबत बारबराने अधिक माहिती देताना सांगितलं, की हा फोटो त्याने जून 2016 मध्ये काढला होता. पर्वतावर रडणाऱ्या मुलाच्या बाजूला आणखी व्यक्तीही दिसत होता. या फोटोमुळे अनेक लोक गोंधळात पडले आहेत. तसंच इतक्या वर बसून रडणाऱ्या या मुलामुळेही नेटकरी हैराण आहेत. google secret photo

  हे वाचा - दरवाजा बंद करून भलतेच उद्योग करायचं जोडपं; घराची भिंत पाहून चक्रावली मुलगी

  फॉसिल पर्वत कॅनडातील अल्बर्टा प्रांतात आहे. 1906 मध्ये याच नाव ठेवण्यात आलं होतं. या ठिकाणी अनेक फॉसिल्स आढळले होते, त्यामुळेच या फॉसिल पर्वत असं नाव देण्यात आलं होतं. परंतु हा मुलगा पर्वताच्या टोकावर इतक्या वर नेमकं का, कशासाठी रडत होता, पर्वताच्या टोकावर असं काय झालं की मुलाला कोसळलं रडू? या प्रश्नाने अनेकांना हैराण केलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Photo viral

  पुढील बातम्या