जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / या Mental Health Apps द्वारे चोरी होतोय युजर्सचा डेटा, तुमच्या फोनमध्ये तर नाही?

या Mental Health Apps द्वारे चोरी होतोय युजर्सचा डेटा, तुमच्या फोनमध्ये तर नाही?

या Mental Health Apps द्वारे चोरी होतोय युजर्सचा डेटा, तुमच्या फोनमध्ये तर नाही?

32 पैकी 29 Apps युजरची गोपनीयता आणि डेटा संरक्षित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. Mozilla च्या एका रिसर्चमध्ये या बाबी समोर आल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 4 मे : अनेक जण आपल्या स्मार्टफोनमध्ये मेंटल हेल्थ आणि प्रेयर मोबाइल Apps ठेवतात. पण हेच Apps तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकतात. मानसिक शांती प्रदान करण्याचा दावा करणारे काही लोकप्रिय मानसिक आरोग्य आणि प्रार्थना मोबाइल Apps युजरच्या गोपनीयतेला आणि डेटाला गंभीर धोका निर्माण करत आहेत. 32 पैकी 29 Apps युजरची गोपनीयता आणि डेटा संरक्षित करण्यात अयशस्वी ठरले आहेत. Mozilla च्या एका रिसर्चमध्ये या बाबी समोर आल्या आहेत. युजरच्या प्रायव्हसी आणि डेटा सिक्योरिटीकडे गंभीरपणे दुर्लक्ष करणाऱ्या Apps मध्ये टॉकस्‍पेस (Talkspace), बेटर हेल्‍थ (Better Health) आणि Calm सारखे Apps सामिल आहेत, ज्याचा वापर जगभरातील कोट्यवधी लोक करत आहेत. Mozilla द्वारे तयार करण्यात आलेल्या Privacy Not Included गाइड लिस्‍टमध्ये या Apps चा समावेश करण्यात आला आहे, जे प्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी निर्धारित मानकांचं पालन करत नाहीत. गॅजेट्स 360 डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, लोकांना मानसिक शांती देण्याचा दावा करणारे हे Apps युजरच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी बनवलेले मूलभूत नियमही पाळत नाहीत. काही Apps वर केवळ एका अक्षराचे किंवा अगदी कमी संख्येचे पासवर्ड तयार केले जाऊ शकतात. युजर्सचा डेटा चोरुन हे Apps डेटा ब्रोकर्सनाही विकत आहेत. अधिकतर मेंटर हेल्थ App अतिशय विक असून हे App युजर्सला अतिशय पर्सनलाइज्ड Ad पाठवतात. बेटर हेल्‍प (Better Help), यूपर (Youper), वूइबोट (Woebot), बेटर स्‍टॉप सुसाइड (Better Stop Suicide), प्रे डॉट कॉम (Pray.com) आणि टॉकस्‍पेस (Talkspace) हे App आहेत, ज्यात युजर्सची प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षासारख्या त्रुटी आढळल्या आहेत. हे वाचा -  WhatsApp ची मोठी कारवाई, 18 लाखांहून अधिक भारतीय अकाउंट्स बॅन; एक चूक पडली भारी त्यामुळे तुम्हीही अशा कोणत्या App चा वापर करत असाल, तर ते लगेच अनइन्स्टॉल करणं फायद्याचं ठरेल. अन्यथा युजरचा डेटा हॅकर्सपर्यंत पोहोचू शकतो आणि युजरच्या पर्सनल तसंच बँकिंग माहितीला धोका निर्माण होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: apps , Tech news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात