मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! हे APP वापरत असाल तर WhatsApp Account होईल बॅन

Alert! हे APP वापरत असाल तर WhatsApp Account होईल बॅन

दुसरा पर्याय अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा आहे. त्यासाठी युजरला कंपनीला "Lost/Stolen: Please deactivate my account" असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (+91) लिहावा लागेल. एकदा डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. हे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.

दुसरा पर्याय अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्याचा आहे. त्यासाठी युजरला कंपनीला "Lost/Stolen: Please deactivate my account" असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (+91) लिहावा लागेल. एकदा डिअ‍ॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. हे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.

काही डेव्हलपर्सनी काही फीचर्सचा वापर करुन एक असं अ‍ॅप बनवलं आहे, ज्यात युजर्स आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटला ट्रान्सफर करू शकतात. परंतु हे व्हॉट्सअ‍ॅपचं अनधिकृत वर्जन आहे.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. पण इथे एक अ‍ॅप असंही आहे, ज्याचा वापर धोकादायक ठरू शकतो आणि मेसेजेंर प्लॅटफॉर्म युजरला कायमसाठी आपल्या मेसेजिंग अ‍ॅपवरुन बॅन करू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी दररोज नवीन फीचर लाँच करत असतं. परंतु यात अद्यापही ऑटो रिप्लाय, शेड्यूलिंग चॅट असे पर्याय मिळत नाहीत. त्यामुळे काही युजर्सकडून अनधिकृत WhatsApp चा वापर केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार, काही डेव्हलपर्सनी काही फीचर्सचा वापर करुन एक असं अ‍ॅप बनवलं आहे, ज्यात युजर्स आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटला ट्रान्सफर करू शकतात. परंतु हे व्हॉट्सअ‍ॅपचं अनधिकृत वर्जन आहे. हे अ‍ॅप अगदी खऱ्या व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच दिसतं. परंतु यात खऱ्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये न मिळणारे फीचर्सही मिळतात. हे व्हॉट्सअ‍ॅप GB WhatsApp आणि WhatsApp Plus आहे.

GB WhatsApp व्हॉट्सअ‍ॅपचं एक मॉडिफाय वर्जन आहे. हे खऱ्या व्हॉट्सअ‍ॅपहून वेगळं असून युजर APK फाईलमध्ये ते डाउनलोड करू शकतात. या GB WhatsApp चा खऱ्या WhatsApp शी काहीही कनेक्शन नाही. हे Apple App Store आणि Google Play Store वरही उपलब्ध नाही. हे अ‍ॅप थर्ड पार्टी डेव्हलपर्सनी बनवलं आहे.

WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स

तरीही अनेक युजर्सही हे GB WhatsApp डाउनलोड केलं आहे. परंतु WhatsApp कडून 2019 मध्ये अशा युजर्सची अकाउंट्स बॅन केली होती, जी GB WhatsApp शी जोडलेली होती. तसंच जे युजर्स या अकाउंट्सचा वापर करतील त्यांचं WhatsApp अकाउंट बॅन केलं जाईल, असा इशाराही देण्यात आला होता.

GB WhatsApp मुळे युजरला धोका निर्माण होऊ शकतो. या अ‍ॅपला कोणतंही सिक्योरिटी चेक नाही. खऱ्या अ‍ॅपप्रमाणे यात डेटा सुरक्षित नाही. तसंच प्रायव्हसीबाबतही सुरक्षा मिळत नाही. APK फाईल असल्याने, धोकादायक व्हायरल, मालवेअर फोनमध्ये येऊ शकतो. त्यामुळे फोन हॅक होण्याचा धोका आहे. त्यामुळे खऱ्या WhatsApp शिवाय इतर कोणतंही व्हॉट्सअ‍ॅप न वापरण्याचा सल्ला कंपनीकडून देण्यात देत आहे.

First published:

Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp features, WhatsApp user