मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /UIDAI Alert! Online चुकूनही शेअर करू नका तुमचे Aadhaar डिटेल्स

UIDAI Alert! Online चुकूनही शेअर करू नका तुमचे Aadhaar डिटेल्स

ग्राहक मेलद्वारेही तक्रार दाखल करू शकतात. यासाठी help@uidai.gov.in वर ग्राहक आपली समस्या पाठवू शकतात. UIDAI चे अधिकारी वेळोवेळी मेल चेक करतात आणि ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतात. तक्रार सेल ई-मेलवर उत्तर देऊन समस्यांचं समाधान करतात.

ग्राहक मेलद्वारेही तक्रार दाखल करू शकतात. यासाठी help@uidai.gov.in वर ग्राहक आपली समस्या पाठवू शकतात. UIDAI चे अधिकारी वेळोवेळी मेल चेक करतात आणि ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करतात. तक्रार सेल ई-मेलवर उत्तर देऊन समस्यांचं समाधान करतात.

आधार कार्ड देशातील भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यासोबत काही गैरप्रकार झाल्यास, अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : UIDAI कडून आधार कार्ड (Aadhaar Card) युजर्ससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधारसंबंधी कोणतीही माहिती शेअर करू नये. ट्विटरवर UIDAI ने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आधार कार्ड देशातील भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यासोबत काही गैरप्रकार झाल्यास, अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आधार कार्ड अपडेट करणं केवळ फायदेशीर नसून अनेक ऑनलाईन सेवांसाठी ते आवश्यकही आहे. Aadhaar संबंधी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाचा मोबाईल नंबर UIDAI सह रजिस्टर असणं गरजेचं आहे. याचा उपयोग OTP द्वारे ऑथेंटिकेशनसाठी केला जातो. आधार कार्ड डिटेल्स लीक झाल्यास, किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास ऑनलाईन फ्रॉड, बँकिंग फ्रॉडचा धोका संभवतो.

जर तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल, किंवा आधार कार्डवरील नंबर काही कारणाने बदलायचा असेल, तर ते बदल करता येतात. परंतु Aadhaar Card वर मोबाईल नंबर ऑफलाईन बदलता येऊ शकतो. UIDAI ने माहितीचा चुकीचा वापर रोखण्यासाठी मोबाईल नंबर बदलण्यासाठी ऑनलाईन पद्धत ठेवलेली नाही. यात OTP आणि विना OTP अशा दोन पद्धतींनी मोबाईल नंबर अपडेट करता येऊ शकतो.

OTP द्वारे आधार नंबर अपडेट -

- सर्वात आधी अधिकृत पोर्टल https://ask.uidai.gov.in/ वर जा.

- इथे मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोडने लॉगइन करा, डिटेल्स भरल्यानंतर Send OTP वर क्लिक करा.

- मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिटवर क्लिक करा.

- पुढील पेजवर आधार सर्विसेज न्यू एनरोलमेंट आणि अपडेट आधार असे पर्याय दिसतील. इथे अपडेट आधारवर क्लिक करा.

- आता ‘what do you want to update’ पर्यायत मोबाईल नंबर निवडा.

- पुन्हा मोबाईल नंबर आणि कॅप्चा विचारला जाईल. सर्व डिटेल्स भरा आणि Send OTP वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP भरा आणि तो वेरिफाय करा. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. सर्व डिटेल्स तपासून सबमिटवर क्लिक करा.

- आता अपॉईंटमेंट आयडीसह एक स्क्रिन दिसेल. Book Appointment वर क्लिक करा आणि आधार सेंटरवर स्लॉट बुक करा.

WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स

विना OTP मोबाईल नंबर अपडेट -

- आधार सेंटरवर जावं लागेल.

- इथे आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल.

- सध्याचा मोबाईल नंबर फॉर्मवर लिहा. जुना नंबर लिहिण्याची गरज नाही.

- तेथील संबंधित व्यक्ती तुमची रिक्वेस्ट रजिस्टर करेल.

- एक पावती दिली जाईल, त्यावर URN अपडेट रिक्वेस्ट नंबर दिसेल.

- या सर्विससाठी 25 रुपये भरावे लागतील.

First published:

Tags: Aadhar card