नवी दिल्ली, 12 जुलै : कोरोना काळात देशात डिजीटल व्यवहारात
(Digital Transactions) मोठी वाढ झाली. तर दुसरीकडे बँकिंग फ्रॉड
(Banking Fraud), ऑनलाईन फ्रॉडचं
(Online Fraud) प्रमाणही वाढलं. फ्रॉड करणारे विविध पद्धतींनी, विविध मार्गांचा वापर करुन ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत. बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी प्रायव्हेट सेक्टरमधील अग्रणी बँक आयसीआयसीआय बँकेने
(ICICI Bank) लोकांना अलर्ट केलं आहे. बँकेने ट्विट करत कोट्यवधी ग्राहकांना फ्रॉडबाबत इशारा दिला आहे.
ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना अनट्रेस्टेड सोर्स
(Untrusted Sources) अर्थात अविश्वसनीय सोर्सवरुन App इन्स्टॉल न करण्याचं सांगितलं आहे. बँकेने एक फोटो शेअर करत, कधीही आपल्या फोनमध्ये अनट्रेस्टेड सोर्सवरुन App इन्स्टॉल करण्याची परवानगी देऊ नये, असं सांगितलं आहे.
जर तुमच्या फोनमध्ये Unknown Source किंवा अनट्रेस्टेड सोर्स इनेबल
(Enable) असेल, तर तो त्वरित बंद करा. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर Security मध्ये Unknown Source किंवा अनट्रेस्टेड सोर्स इनेबल असेल, तर तो डिसेबल
(Disable) करा. i अशाप्रकारे काही गोष्टींमध्ये लक्ष दिल्यास फ्रॉडमध्ये फसवण्यापासून बचाव होऊ शकतो.
सिम स्वॅप -
काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय बँकेने ट्विट करत, सिम स्वॅप फ्रॉडबाबत ग्राहकांना अलर्ट केलं होतं. बँकेने ग्राहकांना सतर्क करत, जर ग्राहकांना फोनमध्ये नेटवर्क, अलर्ट किंवा कॉल अधिक काळ येत नसतील, तर लगेच आपल्या मोबाईल नेटवर्क प्रोव्हाईडरशी याबाबत संपर्क करा, असं सांगितलं आहे. सिम स्वॅप म्हणजे सिम एक्सचेंज केलं जातं, ज्यात तुमच्या फोन नंबरवरुन एका नव्या सिमचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि बँकिंग फ्रॉड केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.