नवी दिल्ली, 5 जुलै: देशातील दुसरी सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आयसीआयसीआयने (ICICI Bank) बँकिंग फ्रॉडबाबत ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकेने मोबाईल बँकिंगचा वापर करताना ग्राहकांना सावध राहण्याचं सांगितलं आहे. याबाबत बँकेने ट्विट करत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये बँकेने बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठीच्या टिप्स सांगितल्या आहेत. यामुळे ग्राहक मोठ्या फसवणुकीपासून वाचू शकतात. अन्यथा एक छोटीशी चूकही महागात पडू शकते. मागील काही काळापासून बँकिंग फ्रॉडच्या (Banking Fraud) संख्येत वाढ झाली आहे. ICICI बँकेने ग्राहकांना फसवणुकीपासून अलर्ट (Fraud Alert) राहण्याचं सांगितलं आहे. सतर्क राहा आणि सुरक्षित बँकिंगचा अभ्यास करा. मोबाईलमध्ये नेटवर्क, अलर्ट किंवा कॉलसाठी अधिक काळापर्यंत सिग्नल नसेल, अशावेळी आपल्या मोबाईल नेटवर्क ऑपरेटरशी त्वरित संपर्क करा. यावेळी बँकेने सिम स्वॅप (Sim Card Swap) होणाऱ्या फ्रॉडबाबतही माहिती दिली आहे. सिम स्वॅपद्वारे हॅकर्स ग्राहकांच्या रजिस्टर्ड नंबरवरुन एक नवं सिम कार्ड घेऊन त्यावर येणारे सर्व आर्थिक व्यवहार आणि ओटीपी मिळवतात. यामुळे अकाउंट खाली होण्याचा धोका निर्माण होतो.
(वाचा - Online Fraud चा नवा प्रकार; कॅश ऑन डिलीव्हरीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक )
Stay alert and practice safe banking. Always contact your mobile network provider immediately in case you notice an unusually long absence of network, alerts, or calls.
— ICICI Bank (@ICICIBank) July 3, 2021
Learn more here: https://t.co/DcftA5EXUz
#SIMSwapFraud #iPledgeSafeBanking pic.twitter.com/jdW6Jastal
काय आहे सिम स्वॅप - मोबाईल बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार करणं सहज होतं. यासाठी OTP, URN, 3डी सुरक्षित कोड इत्यादींची आवश्यकता असते. अशात लोकांच्या अकाउंटमध्ये फ्रॉड करण्यासाठी फ्रॉडस्टर्स सिम स्वॅपचा आधार घेतात. यात मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्याकडून ग्राहकांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरसाठी नवं सिम कार्ड देण्याचं सांगतात. नवीन सिमकार्डच्या मदतीने फसवणूक करणारे ग्राहकांच्या बँक खात्याद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी ओटीपी, यूआरएन मिळवतात आणि त्याचा चुकीचा वापर करतात.