Home /News /technology /

Alert! फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Google नेही केलं बॅन; आतापर्यंत 4500 युजर्सला मोठा आर्थिक फटका

Alert! फोनमधून डिलीट करा हे 8 Apps, Google नेही केलं बॅन; आतापर्यंत 4500 युजर्सला मोठा आर्थिक फटका

हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधत असतात. आता क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेंडमध्ये याद्वारे फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : मागील काही महिन्यांपासून क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) मोठी चर्चा असून अनेकांनी यात आवडही दाखवली आहे. याचाच फायदा आता हॅकर्सकडून (Hackers) घेतला जात असल्याचं समोर आलं आहे. हॅकर्स विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधत असतात. आता क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेंडमध्ये याद्वारे फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी युजर्सला मॅलिशिअस अ‍ॅप्स (Malicious Apps) इन्स्टॉल करण्यासाठी सांगितलं जातं. यात धोकादायक मालवेअर आणि अ‍ॅडवेअर (Malware and Adware) असतात. हे अ‍ॅप्स इन्स्टॉल झाल्यानंतर युजरचा डेटा हॅक केला जातो. परंतु गुगलने अशा काही अ‍ॅप्सची ओळख करुन ते गुगल प्ले स्टोरवरुन (Google Play Store) हटवले आहेत. Google ने एकूण 8 धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन डिलीट केले आहेत, जे क्रिप्टोकरन्सी संदर्भात असल्याचं सांगितलं जात होतं. यात अ‍ॅप्समध्ये युजर्सला गुंतवणूक करण्यासाठी सांगून त्याद्वारे मोठी कमाई होईल असं सांगितलं जात होतं. हे अ‍ॅप्स लोकांची अ‍ॅड्सद्वारे फसवणूक करत होते. सिक्योरिटी फर्म ट्रेंड मायक्रोने याबाबतची माहिती गुगल प्ले स्टोरला दिली आणि त्यानंतर गुगलकडून हे धोकादायक अ‍ॅप्स हटवण्यात आले.

    Banking Fraud रोखण्यासाठी या 8 गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा बसेल मोठा फटका

    - BitFunds – Crypto Cloud Mining - Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet - Ethereum (ETH) – Pool Mining Cloud - Daily Bitcoin Rewards – Cloud Based Mining System - Bitcoin Miner – Cloud Mining - Crypto Holic – Bitcoin Cloud Mining - Bitcoin 2021 - MineBit Pro – Crypto Cloud Mining & btc miner

    सावधान! या वेबसाईटद्वारे Hack होऊ शकतं तुमचं Bank Account, अशी होतेय फसवणूक

    महत्त्वाची बाब म्हणजे, गुगलने हे अ‍ॅप्स हटवले असले, तरी ज्या युजर्सनी हे अ‍ॅप्स डाउनलोड केले होते, त्यांच्या फोनमध्ये हे असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे हे 8 अ‍ॅप्स फोनमध्ये असल्याच लगेच डिलीट करण्याचं सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय सिक्योरिटी फर्म ट्रेंड मायक्रोने आतापर्यंत 120 फेक क्रिप्टोकरन्सी मायनिंग अ‍ॅप्स उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. या अ‍ॅप्सकडे मायनिंग क्षमता नसून ते पूर्णपणे फेक आहेत. अशा क्रिप्टोकरन्सीच्या फेक अ‍ॅप्समुळे जुलै 2020 ते जुलै 2021 पर्यंत जवळपास 4500 युजर्सला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Cyber crime, Online fraud

    पुढील बातम्या