मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /केवळ या एका नंबरने हॅक होईल WhatsApp Account, चुकूनही करू नका डायल

केवळ या एका नंबरने हॅक होईल WhatsApp Account, चुकूनही करू नका डायल

WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.

WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.

WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.

नवी दिल्ली, 13 मे : अनेकजण ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर करतात. यात ट्रान्झेक्शन वेगात आणि कोणत्याही समस्येशिवाय सहज होतं. त्यामुळेच याला अधिक पसंतीही आहे. आता WhatsApp नेही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी WhatsApp Payment ची सुविधा आणली. पण WhatsApp द्वारे अनेक फ्रॉड झाल्याचं समोर आलं आहे. नुकताच असा आणखी एक प्रकार समोर आला असून युजरचं मोठं नुकसान झालं आहे.

एका युजरला एयरटेल कंपनीच्या नावाने एक कॉल आला. या कॉलमध्ये कंपनीच्या नावाने कॉल करणाऱ्याने युजरला इंटरनेट इश्यूबाबत तक्रार आल्याचं सांगितलं. परंतु युजरने त्याचे वडील फॅमिल प्लॅन असल्याने यासंबंधी सर्व कॉल ते पाहतात तसंच सध्या ते घरी नसून नंतर कॉल करा असं युजरने फ्रॉडस्टरला सांगितलं.

युजरच्या या उत्तराने फ्रॉडस्टरने आणखी एक गोष्ट केली. युजरला 401*8404975600 डायल करण्यास सांगितलं आणि एयरटेल कॉल सेंटरकडून कोणी 1-2 दिवसांत पुन्हा कॉल करेल असंही म्हटलं. हा WhatsApp युजर या बोलण्यात अडकला आणि त्याने फ्रॉडस्टरने सांगितलेला नंबर डायल केला.

10 मिनिटांत झाला फ्रॉड -

या कॉलनंतर एक धक्कादायक बाब घडली. कॉल केल्यानंतर केवळ 10 मिनिटांत युजरला WhatsApp वर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये लॉगइन पीनसाठी विचारण्यात आलं होतं, जेणेकरुन फ्रॉडस्टर एका नव्या डिव्हाइसवर आपला मोबाइल नंबर सेट करू शकतील. काही सेकंदात युजर मोबाइल आणि लॅपटॉप दोन्हीवरुन लॉग आउट झाला. यामुळे युजर गोंधळला आणि काही वेळात WhatsApp सर्व संपर्क आपोआप गायब झाले.

युजरने जो कोड डायल केला होता त्यामुळेच हा फ्रॉड झाला. तो कोड डायल करण्याचा अर्थ युजरचे सर्व इनकमिंग कॉल्स त्या नंबरवर जातील आणि फ्रॉडस्टर युजरचं सीम कार्ड वापरू शकतील.

फ्रॉडस्टरने फोन हॅक केल्यानंतर काही मिनिटांत युजरच्या अकाउंटवरुन 45-50 लोकांना मेसेज केला होता आणि मेसेजमधून पैसे मागितले होते. तात्काळ पैशांची गरज असल्याचं सांगत मेसेज करण्यात आले होते. काही पैसे पेटीएमवर मागितले होते. युजरच्या काही मित्रांनी 1000 रुपये, 2000 रुपयांची मदत केली. त्यानंतर फ्रॉड झाल्याचं समजताच युजरने सायबर क्राइम डिपार्टमेंटमध्ये तक्रार दाखल केली.

हे वाचा - हे 4 अंक लक्षात ठेवा, Cyber Crime झाल्यास लगेच करा डायल; पैसे परत मिळण्यास होईल मदत

या गोष्टी चुकूनही करू नका -

- WhatsApp वर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबर करा. यामुळे OTP येतो. अशाप्रकारे कोणी लॉगइन केल्यास OTP मिळाल्याशिवाय कोणीही लॉगइन करू शकत नाही.

- तसंच 401 आणि त्यानंतर 10 अंकी मोबाइल नंबर कधीही डायल करू नका. कारण हा कॉल फॉर्वर्डसाठीचा कोड आहे.

- कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तसंच कोणी मेसेज पैसे मागितल्यास आधी त्या संबंधित व्यक्तीला कॉल करा आणि खरंच त्याने पैसे मागितले का याची खात्री करा.

First published:

Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp News