नवी दिल्ली, 28 जानेवारी : चायनीज टेक्नोलॉजी कंपनी शाओमीने (Xioami) शुक्रवारी एक नवी चार्जिंग टेक्नोलॉजी लाँच केली आहे. कंपनीने याला Mi Air Charge असं नाव दिलं आहे. ही नवी टेक्नोलॉजी सध्याच्या वायरलेस चार्जिंग पद्धतीहून वेगळी आहे. Mi Air Charge टेक्नोलॉजीद्वारे युजर्स दूरवरूच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसला चार्ज करू शकतील. या टेक्नोलॉजीने विना वायर, गेम खेळताना, चालतानाही एकावेळी अनेक डिव्हाईस चार्ज केले जाऊ शकतील. शाओमीने एका ब्लॉगपोस्टद्वारे या नव्या टेक्नोलॉजीची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या टेक्नोलॉजीद्वारे कोणत्याही डिव्हाईसला दूरवरुनच चार्ज केलं जाऊ शकेल. यात कोणत्याही केबल किंवा वायरलेस चार्जिंग स्टँडची गरज नाही. हे ट्रू वायरलेस चार्जिंग सिस्टम असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.
Revolutionizing the current wireless charging methods, #MiAirCharge Technology charges your devices remotely, without cables and charging stands. Let's see it in action! #InnovationForEveryone pic.twitter.com/9bD0Awul4s
— Xiaomi (@Xiaomi) January 29, 2021
ही चार्जिंग पद्धत स्पेस पोजिशनिंग आणि एनर्जी ट्रान्समिशन बेस्ड आहे. शाओमीने स्वत: डेव्हलप केलेल्या आयसोलेटेड चार्जिंग पाईलमध्ये इन-बिल्ट 5 फेज इंटरफेस अँटिना आहे, जो स्मार्टफोनच्या लोकेशनचा ठिकाण अचूक सांगतो. 144 अँटिनाने बनलेला एक फेज कंट्रोल एरे मिलीमीटर-वाईड वेव्सला बीमफॉर्मिंगद्वारे थेट फोनमध्ये ट्रान्समिट करतो.
शाओमीने बिल्ट-इन beacon अँटिना आणि रिसिव्हिंग अँटिना एरेसह एक छोटा अँटिनाही डेव्हलप केला आहे. beacon अँटिना लो पॉवर कंजप्शनसह पोजिशन इंर्फोर्मेशन ब्रॉडकास्ट करतो. त्याचप्रमाणे 144 अँटिनाने बनलेला रिसिव्हिंग अँटिना एरे चार्जिंग पाईलद्वारा एमिट केलेले मिलीमीटर वेव सिग्नलला रेक्टिफायर सर्किटद्वारे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. अशाप्रकारे हे चार्जिंग सिस्टम काम करतं.
We're excited to bring you the remote charging technology - Mi Air Charge Technology! Charge multiple devices simultaneously while you're gaming, walking around or even when something's in the way, no strings attached. Another giant leap forward in wireless charging technology! pic.twitter.com/wEoB10wOQ2
— Xiaomi (@Xiaomi) January 29, 2021
सध्या शाओमीची ही नवी चार्जिंग टेक्नोलॉजी सिंगल डिव्हाईसला 7 मीटरच्या रेंजमध्ये 5W रिमोट चार्जिंग देण्यास सक्षम आहे. त्याशिवाय एकाचवेळी अनेक डिव्हाईस चार्ज केली जाऊ शकतात. प्रत्येक डिव्हाईसला 5W चा सपोर्ट मिळेल. येणाऱ्या काळात या चार्जिंग टेक्नोलॉजीने वॉच, ब्रेसलेट आणि इतर वियरेबल डिव्हाईसही चार्ज केले जाऊ शकतात.