Home /News /technology /

WhatsApp Web Security आणखी मजबूत; डेस्कटॉपवर सुरू करण्यासाठी करावं लागणार व्हेरिफिकेशन

WhatsApp Web Security आणखी मजबूत; डेस्कटॉपवर सुरू करण्यासाठी करावं लागणार व्हेरिफिकेशन

आपल्या अकाउंटला वेब किंवा डेस्कटॉपशी कनेक्ट करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी युजर्सला फोनवर फेस किंवा फिंगरप्रिंट अनलॉकचा वापर करावा लागेल.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कॉपसाठी (Whatsapp Web Security) नव्या सिक्योरिटी फीचर्सची घोषणा केली आहे. आता युजर्सला आपलं वेब किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करण्यासाठी वेरिफिकेशन करावं लागेल. युजर्सला फिंगरप्रिंट स्कॅनिंग किंवा फेस रिकॉगनायझेशनचा वापर करून परवानगी द्यावी लागेल. येणाऱ्या काही दिवसांत सिक्योरिटी फीचर्स लाँच होऊ शकतात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या अकाउंटला वेब किंवा डेस्कटॉपशी कनेक्ट करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी युजर्सला फोनवर फेस किंवा फिंगरप्रिंट अनलॉकचा वापर करावा लागेल. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करण्यासाठी केवळ एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागत होता. मल्टी डिव्हाईस लॉगइन फीचर - फेसबुकचं (Facebook) स्वामित्व असणाऱ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच मल्टी डिव्हाईस लॉगइन फीचर दिलं जाऊ शकतं. सध्या आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला एका वेळी कंप्युटरमध्ये एकच जण लॉगइन करू शकतो. परंतु आता येत्या काळात मल्टी डिव्हाईस लॉगइन करता येऊ शकतं. या फीचरची माहिती कंपनीने स्वत: ट्विट करून दिली आहे. असा करता येणार वापर - - व्हॉट्सअ‍ॅप वेब किंवा व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपवर अकाउंट लिंक करण्यासाठी फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावं लागेल. - त्यानंतर टॉप राईटला दिलेल्या तीन डॉटच्या मदतीने सेटिंग्ज बारमध्ये जा. - व्हॉट्सअ‍ॅप वेब/ डेस्कटॉपवर क्लि करा. - अँड्रॉईड युजर्स Link a Device वर क्लिक करा. त्यानंतर फोनमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन स्क्रिनवर दिसल्यानंतर प्रक्रिया फॉलो करा.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Whatsapp chat, WhatsApp features

    पुढील बातम्या