Home /News /technology /

WhatsApp चं नवं फीचर, आता फोन हँग होण्याची समस्या संपणार, वाचा नव्या अपडेटमध्ये काय मिळणार

WhatsApp चं नवं फीचर, आता फोन हँग होण्याची समस्या संपणार, वाचा नव्या अपडेटमध्ये काय मिळणार

Disappearing Message फीचरमध्ये मेसेज रीड झाल्यानंतर सात दिवसांच्या आत आपोआप डिलीट होतो. पण आता या फीचरमध्ये काही अपडेट येणार आहेत.

  नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये डिसअपियरिंग मेसेज (Disappearing Message Feature) हे नवं फीचर लाँच केलं होतं. या फीचरमध्ये मेसेज रीड झाल्यानंतर सात दिवसांच्या आत आपोआप डिलीट होतो. पण आता या फीचरमध्ये काही अपडेट येणार आहेत. आता कंपनी युजर्सला आपले मेसेज अधिक दिवसांपर्यंत ठेवण्यासाठीचा एक पर्याय देणार असल्याची माहिती आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट ट्रॅकर WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या फीचरमध्ये मेसेज 90 दिवसांपर्यंत ठेवण्याचा पर्याय टेस्ट करत आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड बीटा वर्जन 2.21.17.16 मध्ये 90 दिवसांपर्यंत मेसेज ठेवण्याचा पर्याय देऊ शकतं. WABetaInfo ने एक स्क्रिनशॉट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

  Alert! हे APP वापरत असाल तर WhatsApp Account होईल बॅन

  या रिपोर्टमध्ये 7 दिवसांसह 90 दिवसांचाही पर्याय दिसत असल्याचं म्हटलं आहे. त्याशिवाय 24 तासांसाठीचा पर्यायही असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या नव्या फीचरसाठी कंपनी अनेक दिवसांपासून टेस्ट करत आहे. हे फीचर सध्या अंडर डेव्हलपमेंट असून बीटा टेस्टर्ससाठीही उपलब्ध नाही.

  WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स

  RAM कमी असणाऱ्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरताना स्टोरेज फुल होण्याची समस्या येते. त्यामुळे फोन हँग होतो. परंतु या फीचरच्या मदतीने फोनचं व्हॉट्सअ‍ॅप स्टोरेज आपोआप डिलीट केलं जाईल. त्यामुळे फोन हँग होण्याची समस्याही कमी होईल. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपने iPhone मधून अँड्रॉईड आणि अँड्रॉईडमधून iPhone मध्ये चॅट ट्रान्सफर करण्याचं फीचर दिलं आहे. ज्यात चॅटशिवाय व्हॉईस नोट, इमेज एका क्लिकवर ट्रान्सफर करता येतील. पहिल्यांदाच युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपने असं फीचर दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या अँड्रॉईड फोनमध्ये चॅट बॅकअपसाठी गुगल ड्राईव्हचा वापर करतं. तर iPhone मध्ये चॅट बॅकअपसाठी व्हॉट्सअ‍ॅप iCloud चा वापर करतं.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या