मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सरकारी App मध्ये सुरक्षित ठेवा Aadhaar, PAN डॉक्युमेंट्स, काय आहेत DigiLocker चे फायदे

सरकारी App मध्ये सुरक्षित ठेवा Aadhaar, PAN डॉक्युमेंट्स, काय आहेत DigiLocker चे फायदे

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स सेव्ह ठेवू शकता. DigiLocker App मध्ये ठेवलेल्या डॉक्युमेंट्सला हार्ड कॉपीप्रमाणेच सरकारची मान्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स सेव्ह ठेवू शकता. DigiLocker App मध्ये ठेवलेल्या डॉक्युमेंट्सला हार्ड कॉपीप्रमाणेच सरकारची मान्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स सेव्ह ठेवू शकता. DigiLocker App मध्ये ठेवलेल्या डॉक्युमेंट्सला हार्ड कॉपीप्रमाणेच सरकारची मान्यता आहे.

नवी दिल्ली, 11 एप्रिल : डिजीटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत (DIC) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) 2015 मध्ये डिजीटल प्लॅटफॉर्म डिजीलॉकर लाँच केला होता. या App वर देशातील लोक आपले आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, पॅन कार्डसारखे डॉक्युमेंट्स ठेवू शकतात. याचा फायदा म्हणजे प्रत्येकवेळी सोबत हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ठेवण्याची गरज नाही. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स सेव्ह ठेवू शकता. DigiLocker App मध्ये ठेवलेल्या डॉक्युमेंट्सला हार्ड कॉपीप्रमाणेच सरकारची मान्यता आहे.

भारत सरकारने डिजीटल इंडिया अंतर्गत डिजीलॉकर सुविधा दिली आहे. यात 1GB पर्यंत क्लाउड स्टोरेज मोफत मिळतो. डॉक्युमेंट्स स्कॅन करुन ठेवता येतात आणि आवश्यकता असल्यास अॅक्सेस करता येतात.

हे वाचा - Driving License जवळ नसलं तरी कापलं जाणार नाही चालान, फक्त जवळ हवी ही एक गोष्ट

DigiLocker App साठी कसं कराल Sign-up -

वेबसाइटवर जा आणि साइन-अपवर क्लिक करा. त्यानंतर मोबाइल, आधार नंबर आणि इतर डिटेल्स टाका. DigiLocker App अॅक्सेस करण्यासाठी आधार OTP चा पर्याय असतो. म्हणजेच DigiLocker App मध्ये लॉगइन केल्यानंतर चार अंकी पीन नंबरची गरज असते. याद्वारे डिजीलॉकर अकाउंट तयार होईल.

हे वाचा - सनी लिओनीसह राजकुमार रावसोबत पॅन कार्ड फ्रॉड; तुमच्या PAN Card चा चुकीचा वापर होत नाही ना? असं तपासा

DigiLocker App आधारशी लिंक करणं गरजेचं असतं. याच्या मदतीने कोणत्याही कागदपत्रांचा वापर करता येतो. मोबाइलशिवाय हे App लॅपटॉप किंवा कंप्यूटरवरही साइन-इन करता येतं. गरज पडल्यास डॉक्युमेंट सेव्ह करू शकता आणि प्रिंटही काढू शकता. तसंच हे सरकारी App असल्याने यात ठेवलेल्या डॉक्युमेंट्सच्या सॉफ्ट कॉपी सरकार मान्य आहेत.

First published:
top videos

    Tags: Government apps, Tech news