नवी दिल्ली, 4 एप्रिल : वाहन चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (Registration Certificate) सोबत ठेवण्याची गरज नाही. वाहतूक पोलीस आणि वाहतूक विभागाकडून विचारणा केल्यास वाहनचालक डिजिटल स्वरुपात ठेवलेली कागदपत्र दाखवू शकतात. डिजी-लॉकर (DigiLocker) किंवा एम-परिवहन (mParivahan) मोबाइल अॅपवरील ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दाखवता येतं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या कोणत्याही कागदपत्रांची हार्ड कॉपी सोबत ठेवण्याची गरज लागत नाही. तसंच या App मध्ये हे कागदपत्र ठेवल्यास सुरक्षितही राहतात. अनेकदा घाईत कधी बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स विसरलं जातं. कधी ते फाटलं असेल किंवा इतर कारणांमुळे जवळ नसल्यास मोठी समस्या येते. पण एका ट्रिकने ड्रायव्हिंग लायसन्स जवळ नसेल, तरी ट्रॅफिक पोलीस तुमचं चालान कापू शकत नाही. ड्रायव्हिंग करणाऱ्यांसाठी ही ट्रिक अतिशय फायदेशीर ठरू शकते. DigiLocker हे असं App आहे, जिथे तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हीकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसारखे डॉक्युमेंट्स सेव्ह करुन सुरक्षित ठेवू शकता. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) हे App लाँच केलं आहे. DigiLocker App तुमच्या आधार कार्ड आणि फोन नंबरशी लिंक असतं. यात डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी PDF, JPEG किंवा PNG फॉर्मेटमध्ये अपलोड करुन सेव्ह ठेवता येते. DigiLocker किंवा mParivahan या मोबाइल App वर डिजीटल स्वरुपात ठेवलेलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत वैध कागदपत्रं आहेत. या App मधील सॉफ्ट कॉपी वैध आहे. परंतु ड्रायव्हिंग लायसन्सची आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सॉफ्ट कॉपी या App शिवाय इतर कोणत्याही स्वरुपात स्वीकारली जाणार नाही.
हे वाचा - सनी लिओनीसह राजकुमार रावसोबत पॅन कार्ड फ्रॉड; तुमच्या PAN Card चा चुकीचा वापर होत नाही ना? असं तपासा
ड्रायव्हिंग लायसन्स फिजीकली जवळ न ठेवता तुम्ही अधिकृत App द्वारे ते ऑनलाइन रुपात जवळ ठेवू शकता. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स विरसल्याची, फाटल्याची कोणतीही चिंता राहणार नाही. तसंच ट्रॅफिक पोलिसांना सरकारी अधिकृत App मधील हे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणं कायदेशीर आहे.