• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 'Android'फोन युजर्ससाठी 'हे' सिक्रेट कोड आहेत महत्त्वाचे; अन्यथा बसेल मोठा फटका

'Android'फोन युजर्ससाठी 'हे' सिक्रेट कोड आहेत महत्त्वाचे; अन्यथा बसेल मोठा फटका

अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या युजर्सची संख्या मोठी आहे. परंतु, अँड्रॉइड फोनमध्ये काही सिक्रेट कोड असतात, याचा वापर करून तुम्ही तांत्रिक बाबींची माहिती घेऊ शकता.

  • Share this:
 मुंबई, 24 सप्टेंबर-  बहुतांश युजर्स अँड्रॉइड फोनचा (Android Phone) वापर करतात. आता जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्यामुळं स्मार्टफोन महत्त्वाची गरज बनला आहे. अँड्रॉइड फोन मधील अनेक फिचर्स हे युजर फ्रेंडली असल्यानं आयफोनच्या (iPhone) तुलनेत या फोनकडं युजर्सचा कल अधिक असतो. सध्या बाजारात विविध कंपन्यांचे अनेक फिचर्स असलेले अँड्रॉइड फोन उपलब्ध आहेत. मात्र युजर्स त्यांच्या गरजेनुसार फोनचं मॉडेल निवडताना दिसतात. तुम्ही जर अँड्रॉइड फोन युजर्स असाल तर त्यातील काही सिक्रेट कोड विषयी (Secret Code) माहिती असणं आवश्यक आहे. या सिक्रेट कोडचा वापर करून तुम्ही फोनचा IMEI क्रमांक, एसएआर व्हॅल्यू (SAR Value), स्टोरेज, बॅटरी, नेटवर्क स्टॅटिस्टिक आदी बाबी सहजपणे जाणून घेऊ शकता. तसेच एका सिक्रेट कोडच्या मदतीनं तुम्ही फोन रिसेटही (Reset) करू शकता. हे कोड कोणते आहेत, याविषयीची माहिती जाणून घेऊया. अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या युजर्सची संख्या मोठी आहे. परंतु, अँड्रॉइड फोनमध्ये काही सिक्रेट कोड असतात, याचा वापर करून तुम्ही तांत्रिक बाबींची माहिती घेऊ शकता. फोनमधील बॅटरी आणि नेटवर्कविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमधील डायल पॅडवर *#*#4636#*#* हा सिक्रेट कोड टाइप करून डायल म्हणावं. त्यानंतर क्षणार्धात ही माहिती तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रिनवर दिसेल. (हे वाचा:Amazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का? अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान) तुमच्या मोबाईलवरील कॅलेंडरने किती स्टोरेज (Storage) वापरलं आहे, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अँड्रॉइड फोनमधील डायल पॅडवर (Dial Pad) #*#225#*#* हा सिक्रेट कोड टाइप करावा लागेल. हा कोड डायल केल्यावर स्टोरेजची माहिती तुम्हाला स्क्रिनवर दिसेल. जर तुम्हाला अँड्रॉइड फोनची Specific Absorption Value तपासायची असेल तर डायल पॅडवर *#07# टाइप करावे. हा सिक्रेट कोड टाइप केल्यावर काही क्षणातच तुम्हाला फोनची एसएआर व्हॅल्यू समजेल. (हे वाचा:मोबाईल नंबर लिंक नसला तरी Aadhaar Card डाऊनलोड करता येईल; अशी आहे सोपी प्रोसेस) अँड्रॉइड फोनसाठी IMEI हा एक जनरल कोड असतो. मात्र हा कोड अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. हा कोड जाणून घेण्यासाठी फोनच्या डायल पॅडवर *#06# हा क्रमांक डायल करावा. त्यानंतर तुम्हाला फोनच्या स्क्रीनवर IMEI क्रमांक दिसेल. जर तुम्हाला अँड्रॉइड फोन रिसेट करायचा असेल तर तुम्ही फोनमधील डायल पॅडवर *2767*3855# हा क्रमांक डायल करावा. यामुळं तुमचा फोन फॅक्ट्री रिसेट होईल आणि तुमच्या फोनमधील सर्व डेटा जाईल. त्यामुळं हा सिक्रेट कोड डायल करण्यापूर्वी महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घेणं गरजेचं आहे. हे सिक्रेट कोड अँड्रॉइड फोन युजर्ससाठी महत्त्वाचे असून, गरजेनुसार युजर्स याचा वापर करू शकतात.
First published: