मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Joker Malware द्वारे तुमच्या फोनमध्ये अशी होतेय हेरगिरी, लगेच डिलीट करा हे Apps; अन्यथा बसेल मोठा फटका

Joker Malware द्वारे तुमच्या फोनमध्ये अशी होतेय हेरगिरी, लगेच डिलीट करा हे Apps; अन्यथा बसेल मोठा फटका

सध्या असे 11 अ‍ॅप्स आढळले आहेत, जे जोकर मालवेअरसह असून अँड्रॉईड फोनला धोका निर्माण करतात. तुमच्या फोनमध्येही हे 11 अ‍ॅप्स असतील, तर लगेच डिलीट करा.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 जुलै : कोणतेही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोर वरुन डाउनलोड करणं सुरक्षित ठरतं. परंतु गुगल प्ले स्टोरवरही काही असे अ‍ॅप्स आहेत, जे अँड्रॉईड फोनसाठी नुकसानकारक ठरू शकतात. हे अ‍ॅप्स युजर्सच्या फोनमधील माहिती चोरी करतात. यामुळे बँकिंग फ्रॉडचा, आर्थिक नुकसानाचा मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. Zscaler's ThreatLabz सायबर सुरक्षा सिक्योरिटी तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे. 11 अ‍ॅप्सपासून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गुगल प्ले स्टोरवर कोणतंही अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी सुरक्षित असलं, तरी काही हॅकर्स खऱ्या अ‍ॅपप्रमाणेच दिसणारे अ‍ॅप त्यावर टाकतात आणि युजर्सची फसवणूक होते. काही थर्ड पार्टी अ‍ॅप्सही असतात. त्यामुळे अ‍ॅप डाउनलोड करताना सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या असे 11 अ‍ॅप्स आढळले आहेत, जे जोकर मालवेअरसह असून अँड्रॉईड फोनला धोका निर्माण करतात. Joker Malware लोकांची हेरगिरी करणं, माहिती चोरी करणं, SMS वर नजर ठेवणं यासाठी डिझाईन केला जातो. ज्यावेळी जोकर मालवेअर असणारे अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल होतात, त्यावेळी याचा उपयोग आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला जातो.

Zero-Click Hacks: काहीही न करता 'हॅक' व्हाल, असं काम करतात झिरो क्लिक हॅक्स

जोकर सर्व सूचना वाचण्याची परवानगी मागतो आणि अँड्रॉईड सिस्टमचा दुरुपयोग करतो. तो अँड्रॉईड युजरच्या फोनमधील नोटिफिकेशन वाचू शकतो. युजरने यासाठी परवानगी दिली तर हा मालवेअर नोटिफिकेशनमध्ये हेराफेरीही करतो. Print Scanner, Read Scanner, Translate Free, Comply QR Scanner, PDF Converter Scanner, Delux Keyboard, Private Message, Font Style Keyboard, Free Affluent Message, Saying Message हे 11 अ‍ॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील, तर लगेच डिलीट करा.

SMS, WhatsApp,मिस्ड कॉलसह या पद्धतींनीही हॅक केला जातो मोबाईल फोन;अशी घ्या काळजी

ट्रान्सलेट फ्री, पीडीएफ कन्व्हर्टर स्कॅनर याद्वारे हा जोकर मालवेअर फोनमध्ये येतो. मागील दोन महिन्यांमध्ये 50 हून अधिक अ‍ॅपमध्ये जोकर पेलोडची माहिती मिळाली आहे, ज्यात दररोजच्या वापरातील हेल्थ, यूटीलिटी अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे.

First published:

Tags: Hacking, Malware, Tech news