नवी दिल्ली, 12 मे : एखाद्या दुकानात कोणतीही गोष्ट किंवा एखादी महागडी वस्तू खरेदी करताना त्याची गॅरेंटी आणि वॉरंटी विचारली जाते. अनेकांना यातला फरक समजत नाही आणि या दोन्ही गोष्टी एकच असल्याच समजतात. पण असं नसून गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये मोठा फरक आहे.
काय आहे गॅरेंटी?
गॅरेंटी (Guarantee) म्हणजे कंपनी आपल्या वस्तूची संपूर्ण जबाबदारी घेते. जर एखादा छोटा-मोठा फॉल्ट निघाला तर कंपनी मॅकेनिक पाठवून ती गोष्टी ठीक करुन देते. जर मोठा फॉल्ट निघाला तर कंपनी वस्तू थेट परतही घेऊन जाते.
वॉरंटी म्हणजे काय?
वॉरंटी (Warranty) म्हणजे वस्तूमध्ये कोणाताही छोटा-मोठा फॉल्ट निघाला तरी कंपनी आपलं प्रोडक्ट कोणत्याही परिस्थितीत परत घेत नाही. त्या बदल्यात कंपनी आपला मॅकेनिक घरी पाठवून ती वस्तू ठीक करुन देते. तसंच लहान-मोठे स्पेयर पार्टही लावू शकते.
प्रोडक्ट परत घेतल्यानंतर कंपनीला अधिक नुकसान होतं. त्यामुळे अधिकतर कंपन्या सध्या गॅरेंटीऐवजी वॉरंटी देणं अधिक पसंत करतात. ग्राहकांच्या दृष्टीने पाहिल्यास वॉरंटीमध्येही ग्राहकांचं मोठं नुकसान होत नाही. परंतु वॉरंटीचा फायदा कसा
घ्यायचा याची माहिती असणं गरजेचं आहे.
सामानाचं किंवा वस्तूचं बिल घ्या -
कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचं बिल घेणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय महागडी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या प्रोडक्टमध्ये गॅरेंटी किंवा वॉरंची कार्डवर दुकानदाराची सही असणं किंवा सही-शिक्का असणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी असल्यास तुम्ही खरेदी केलेलं सामान कायदेशीररित्या खरेदी केल्याचं तसंच त्यावर टॅक्सही भरल्याचं मानलं जातं. या दोन्ही शिवाय वस्तू खराब निघाल्यास गॅरेंटी आणि वॉरंटीसाठी ग्राहक कंपनीवर क्लेम करू शकत नाही.
कोणतीही वस्तू खरेदी करताना त्यावर लिहिलेल्या गॅरेंटी-वॉरंटीकडे लक्ष द्या. कोणत्या प्रोडक्टवर गॅरेंटी-वॉरंटी अधिक कालावधीसाठी लिहिलेली आहे हे तपासा. ज्या वस्तूवर अधिक कालावधीसाठी गॅरेंटी आणि वॉरंटी लिहिलेली असेल, तर त्या वस्तूची क्वॉलिटी चांगली असू शकते आणि वस्तू मध्येच खराब झाली तर तुम्हाला त्यावर कोणताही खर्च करावा लागणार नाही.
कंज्यूमर फोरम -
गॅरेंटी आणि वॉरंटीचा कालावधी असूनही कंपनी खराब वस्तू रिपेअर करुन देत नसेल किंवा काही कारणाने टाळाटाळ करत असेल, तर तुम्ही कंज्यूमर फोरममध्ये केस दाखल करू शकता. केस दाखल करण्यासाठी कोणत्याही वकीलाची गरज नाही. तुम्ही स्वत: एका साध्या कागदावर संपूर्ण घटना लिहून फोरममध्ये हा कागद जमा करू शकता. त्यानंतर फोरमकडून कंपनीला नोटिस जारी केली जाते. जर नोटीस पाठवल्यानंतरही कंपनीने गॅरेंटी-वॉरंटी काळात वस्तू रिपेअर करुन दिली नाही, तर फोरक कंपनीविरोधात खटला सुरू करू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news