मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Cyber Fraud: हजारो युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरी, Google ची मोठी कारवाई

Cyber Fraud: हजारो युजर्सचे बँकिंग डिटेल्स चोरी, Google ची मोठी कारवाई

एका अँटी व्हायरस App द्वारे डेटा चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. या अँटी व्हायरस App ने 15000 युजर्सचा बँकिंग डेटा चोरी केला असल्याची माहिती आहे.

एका अँटी व्हायरस App द्वारे डेटा चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. या अँटी व्हायरस App ने 15000 युजर्सचा बँकिंग डेटा चोरी केला असल्याची माहिती आहे.

एका अँटी व्हायरस App द्वारे डेटा चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. या अँटी व्हायरस App ने 15000 युजर्सचा बँकिंग डेटा चोरी केला असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली, 9 एप्रिल : ऑनलाइन, इंटरनेटच्या (Internet) जगात अनेक कामं सोपी, सहज झाली आहेत. ऑनलाइन बँकिंग पेमेंट (Online Banking Payment), ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping), ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform), हॉटेल बुकिंग अशा अनेक गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध होतात. या सर्वांसाठी आपले कार्ड डिटेल्स (Banking Card Details), पर्सनल डिटेल्स त्या-त्या साइटवर अपडेट करावे लागतात. सर्व माहिती इंटरनेटवर द्यावी लागते. त्याचाच फायदा फ्रॉडस्टर्स, सायबर क्रिमिनल्सकडून (Cyber Criminals) घेतला जातो.

नुकतंच एक असं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात एका अँटी व्हायरस App द्वारे डेटा चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. या अँटी व्हायरस App ने 15000 युजर्सचा बँकिंग डेटा चोरी केला असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Google Play Store वर हजारो युजर्सने हे अँटी-मालवेअर Apps डाउनलोड केलं आहेत. या App ने लोकांच्या फोनची सुरक्षा करण्याऐवजी त्याच्या फोनमध्ये व्हायरस सोडून युजर्सची माहिती चोरी केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर Google ने कारवाई केली आहे. गुगलने प्ले स्टोरवरुन 6 अँटी व्हायरस Apps हटवले आहेत. परंतु गुगलच्या कारवाई आधीच अनेक युजर्सने हे App डाउनलोड केलं होतं.

हे वाचा - आधार कार्डला जोडला जाणार जाती-उत्पन्न दाखला, 60 लाख लोकांना मिळणार मोठा फायदा

कशी झाली चोरी?

सायबर सिक्योरिटी रिसर्चर्स चेक (Check Point Software) पॉइंटनुसार, या अँटी व्हायरस App ने Sharkbot Android Malware सोबत मिळून 15000 हून अधिक युजर्सची माहिती आणि बँक डिटेल्स मिळवले. हा मालवेअर अनेक अॅडव्हान्स टेक्नोलॉजी डोमेन जनरेशन अल्गोरिदम - DGA चा वापर करतो.

Sharkbot Malware युजर्सची माहिती आपल्या एका स्पेशल विंडोमध्ये सब्मिट करण्याचं सांगतो. आणि काही युजर्स अशी माहिती सब्मिट करतात. त्यानंतर ज्यावेळी युजर एखादं ट्रान्झेक्शन करतो, त्यावेळी त्याची संपूर्ण माहिती लीक होते. महत्त्वाची बाब म्हणजे या मालवेअरमुळे मोठ्या प्रमाणात भारतीयांना टार्गेट केलेलं नाही.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Malware, Online crime, Online fraud, Tech news