Home /News /technology /

आधार कार्डला जोडला जाणार जाती-उत्पन्न दाखला, 60 लाख लोकांना मिळणार मोठा फायदा

आधार कार्डला जोडला जाणार जाती-उत्पन्न दाखला, 60 लाख लोकांना मिळणार मोठा फायदा

आधार कार्ड हे सध्या भारतीयाचं महत्त्वाचं ओळखपत्र झालं आहे. पॅन कार्डसोबतच कित्येक सरकारी योजना या आधार कार्डसोबत लिंक (Aadhaar link with government schemes) करण्यात आल्या आहेत. यानंतर आता केंद्र सरकारने जातीचा दाखला (Caste Certificate) आणि उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) या गोष्टीदेखील आधार कार्डशी लिंक करण्याची योजना तयार केली आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 7 एप्रिल-  आधार कार्ड हे सध्या भारतीयाचं महत्त्वाचं ओळखपत्र झालं आहे. पॅन कार्डसोबतच कित्येक सरकारी योजना या आधार कार्डसोबत लिंक (Aadhaar link with government schemes) करण्यात आल्या आहेत. यानंतर आता केंद्र सरकारने जातीचा दाखला (Caste Certificate) आणि उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) या गोष्टीदेखील आधार कार्डशी लिंक करण्याची योजना तयार केली आहे. यामुळे शासकीय योजनांचे पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा होण्यास मदत होणार आहे. ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम- आधार आणि जातीचा तसंच उत्पन्नाचा दाखला जोडला गेल्यामुळे सरकारला ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीम (Automatic Verification system) अंमलात आणण्यास मदत होणार आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Student Scholarship) वाटण्याचं काम सोपं होणार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांपासून ही सुविधा सुरू करणार आहे. याला कारण म्हणजे, या राज्यांनी विद्यार्थ्यांचा जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला आधारला लिंक (Aadhaar link with Caste certificate) करण्याचं काम पूर्ण केलं आहे. आज तकने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, Aadhar card
  Aadhar card
  स्कॉलरशिप व्यवस्था होणार डिजिटल- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर मिळणारी शिष्यवृत्ती व्यवस्था ही पूर्णपणे डिजिटल करण्याचं सुचवलं होतं. यावर काम करत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात ही योजना अंमलात आणायचं उद्दिष्ट ठेवलं आहे. इकॉनॉमिक टाईम्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली. संस्थांना नाही, तर थेट विद्यार्थांना मिळणार पैसे- हा निर्णय घेण्यामागे स्कॉलरशिप (Scholership with Aadhaar) व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवण्याचा उद्देशही आहे. कित्येक विद्यार्थ्यांना हे माहिती नसतं की आपल्याला नेमकी कोणती शिष्यवृत्ती मिळत आहे. तसंच, असंही दिसून आलं की काही संस्थांनी एकाच बँक खात्याला 10 ते 12 विद्यार्थ्यांची नावं जोडली आहेत. अशामुळे शिष्यवृत्तीचा पैसा त्या संस्थांकडे जात होता. आता आधारशी लिंक झाल्यामुळे शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. 60 लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा- इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयाचा फायदा देशभरातील 60 लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे. ऑटोमॅटिक व्हेरिफिकेशन सिस्टीममुळे केंद्राकडून येणारी शिष्यवृत्ती ही योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे. विविध कार्डं परस्परांना लिंक करण्यामागे सरकारचा उद्देश एकात्मिक रचना निर्माण करणं हा आहे. परदेशात अशा यंत्रणा योग्य पद्धतीने चालवल्या जातात त्याचा फायदा तिथल्या नागरिकांना होतो. त्याचप्रमाणे सरकारशी संबंधित सर्व कामं कमी वेळात आणि सुरळीत व्हावी यासाठी ही एकात्मिक रचना निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असं सरकारच्या वतीनेच या आधी सांगण्यात आलं आहे.
  First published:

  Tags: Aadhar card, Government

  पुढील बातम्या