नवी दिल्ली, 25 जुलै: सुप्रीम कोर्टाने गाड्यांच्या इन्शोरन्सबाबतचा (Vehicle Insurance) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर तुम्ही भाडेतत्वावर गाडी घेतली असेल, किंवा गाडी मालकाने भाडेतत्वावर गाडी (Car on Rent) दिली असेल तर त्या गाडीचा विमादेखील ट्रान्सफर मानला जाईल. जर भाडेतत्वावर गाडी घेतल्यानंतर अपघात झाला, तर इन्शोरन्स कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागेल. इन्शोरन्सबाबत सुप्रीम कोर्टासमोर मोठा प्रश्न होता, की जर वाहन इन्शोर्ड आहे आणि त्या अॅग्रिमेंट अंतर्गत कॉर्पोरेशन वाहनाला ठरलेल्या मार्गावर चालवलं जात असेल, याचदरम्यान एखादा अपघात झाला, तर नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनी जबाबदार असेल की कॉर्पोरेशन की वाहनाचा मालक? परंतु आता कोर्टाने यावर निर्णय दिला आहे. मागील काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टासमोर एका यूपी स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनसह एका मालकाचं अॅग्रिमेंटसंबंधी प्रकरण समोर आलं होतं. अॅग्रिमेंटनुसार, मालकाने यूपी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला बस भाडेतत्वावर दिली होती. या काळात मालकाने बसचा इन्शोरन्स केला होता. बसचा 25 ऑगस्ट 1998 मध्ये एक अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रब्यूनलमध्ये नुकसान भरपाईची मागणी केली. ट्रब्यूनलने विमा कंपनीला कुटुंबियांना 6 टक्के व्याजासह 1.82 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. परंतु विमा कंपनीने या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं. अलाहाबाद कोर्टाने सांगितलं, की यूपी परिवहन महामंडळ अर्थात ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनद्वारे भाडेतत्वावर ही बस चालवली जात असल्याने विमा कंपनी थर्ड पार्टीला भरपाई देण्यास जबाबदार नाही. मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रब्यूनलच्या या निर्णयाला ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.
(वाचा - SMS, WhatsApp,मिस्ड कॉलसह या पद्धतींनीही हॅक केला जातो मोबाईल फोन;अशी घ्या काळजी )
सुप्रीम कोर्टाने प्रदीर्घ सुनावणीनंतर आपला निर्णय दिला. यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की जर गाडी मालकाकडून एखादी कंपनी किंवा संस्था गाडी भाडेतत्वावर घेते, तर वाहनासह त्याचा थर्ड पार्टी इन्शोरन्सदेखील ट्रान्सफर मानला जाईल. भाडेतत्वावरील अॅग्रिमेंट काळात गाडी अपघातग्रस्त झाली, एखादी दुर्घटना झाली, तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यापासून नाकारु शकत नाही.