नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : सायबर क्राइमसंबंधी तक्रारी दाखल करण्याचा हेल्पलाइन नंबर बदलला आहे. ऑनलाइन फ्रॉडसंबंधी कोणत्याही घटनेची तक्रार करण्यासाठी आता हेल्पलाइन नंबर 155260 च्या ऐवजी 1930 डायल करावा लागेल. गृह मंत्रालयाच्या ट्विटर हँडल सायबर दोस्तने ही माहिती दिली आहे. इंटरनेटचा वापर जसा वाढतो आहे, त्याच वेगात सायबर फ्रॉडची प्रकरणंही वाढत आहेत. सायबर क्रिमिनल्स नव्या नव्या पद्धतींनी लोकांची फसवणूक करत आहेत. बँकेपासून ते अनेक फायनेंशियल सर्विस देणाऱ्या कंपन्या आणि सरकार वेळोवेळी लोकांना ऑनलाइन फ्रॉडबाबत अलर्ट राहण्याचं सांगत आहे. सरकारने सायबर फ्रॉडसंबंधी नवा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 1930 या क्रमांकावर तुम्ही तुमच्या ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राइमसंबंधी तक्रारी नोंदवू शकता. त्याशिवाय सायबर क्राइम वेबसाइट www.cybercrime.gov.in वरही तक्रार दाखल करू शकता.
हे वाचा - तुमच्या PAN Card वर कोणी नकळत Loan घेतलं का? घरबसल्या असं तपासा
डिस्काउंट, ऑफर्सच्या जाळ्यात अडकवून लोकांना फेक लिंक पाठवली जाते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक फेक वेबपेजवर रिडायरेक्ट केलं जातं. तिथे एक फॉर्म भरण्यासाठी सांगितला जातो. इथे पर्सनल डिटेल्स भरावे लागतात. युजर आपली माहिती इथे भरण्याची चूक करतात आणि मोठा फटका बसतो. त्यामुळे सोशल मीडियावर डिस्काउंट, लॉटरी किंवा बक्षिस जिंकल्याच्या जाहिरांकडे लक्ष देऊ नका. जाहिरात पाहून ऑनलाइन शॉपिंगचा विचार करत असाल, तर आधी त्या वेबसाइटबाबत माहिती घ्या. वेबसाइटची रिटर्न पॉलिसी तपासा. काही शंका आल्यास त्यावर शॉपिंग करू नका. कोणतीही पर्सनल माहिती त्या वेबसाइटवर देऊ नका.
हे वाचा - iPhone 13 च्या नावे Online Fraud, Instagram वर अनेक युजर्स स्कॅमर्सच्या जाळ्यात
तसंच कोणीही बँकेचा अधिकारी, वित्तीय संस्थेचा अधिकारी, टेलिकॉम कंपनीकडून बोलत असल्याचं सांगून तुमचे पर्सनल डिटेल्स आधार कार्ड नंबर, बँकिंग डिटेल्स मागत असेल तर ते देऊ नका. कोणताही बँक अधिकारी, टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांकडून अशाप्रकारे माहिती मागत नाही. त्यामुळे KYC अपडेट किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कॉल आल्यास सावध व्हा.