पॉर्न पाहाताना तुमचा VIDEO होऊ शकतो रेकॉर्ड?

पॉर्न पाहाताना तुमचा VIDEO होऊ शकतो रेकॉर्ड?

पॉर्न पाहाणं पडू शकतं महागात, असं होऊ शकतं तुमचं नुकसान.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी: तुम्हाला लपून-छपून पॉर्न पाहण्याची सवय आहे का? सावधान! कारण पॉर्न पाहाणं तुम्हाला चांगलचं महागात पडू शकतं. याचं कारण म्हणजे आता तुमच्यावर हॅकर्सची नजर असणार आहे. लपून पॉर्न पाहणाऱ्या तरुणांना हॅकर्स छुप्या पद्धतीनं रेकॉर्ड करून धमकवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचा व्हिडिओ तयार करून तरुणांना ब्लॅकमेल केलं जातं आणि पैसे उकळले जातात. ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार जुना नाही मात्र यावेळी सायबर सिक्युरिटीपासून वाचण्यासाठी हॅकर्सने वेगळ्या पद्धतीनं षड्.यंत्र रचलं आहे. तुम्ही पॉर्न पाहात असाल तर तुम्हीही यात अडकू शकता.

तरुण पॉर्न पाहात असताना त्यांना हॅकर्स त्या वेबसाइटच्या माध्यमातून छुप्या पद्धतीनं रेकॉर्ड करतात. त्यानंतर तुमच्या ई-मेलवर एक मेल पाठवण्यात येतो. यामध्ये तुम्हाला तुमचा व्हिडिओ बनवून धमकी दिली जाते. ही धमकी सायबर सेलपासून वाचण्यासाठी वेगळ्या भाषेचा वापर केला जातो. मेलमध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते समजण्यासाठी गुगल ट्रान्सलेट करण्याचा पर्याय दिला जातो. पॉर्न पाहत असताना हॅकर्स संबंधिताला एक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन पाठवतात. जेणेकरून त्या व्यक्तीला आपला व्हिडिओ हॅकरजवळ असल्याची खात्री वाटते. त्यामुळे संबंधित व्यक्ती हॅकर्सच्या जाळ्यात अडकतो.

हेही वाचा-Paytm, Google Pay करताना ठाण्यातल्या व्यक्तीला हातोहात फसवलं; 1 लाखाचा गंडा

दरम्यान हॅकर्स ठरावी एक रक्कम मागतात. ती रक्कम न दिल्यास हे फूटेज सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाते. मागण्यात आलेली रक्कम न दिल्यास तो खासगी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी हॅकर्स दिली जाते.अशा घटनांवर आळा घालण्यासाठी या आधीही ई-मेलची सुरक्षितता अधिक चांगली करण्यात आली होती. मात्र तरीही अशा प्रकारचे मेल वेगवेगळ्या पद्धतीनं हॅकर्स पाठवतात. युजर्सला अशा कोणत्याही ई-मेलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसंच कोणत्या हॅकर्सच्या मेलला बळी पडू नये असंही आवाहन कऱण्यात आलं आहे.

हेही वाचा-लवकरच बदलणार WhatsAppचं रुप, नव्या वर्षात होणार 5 मोठे बदल

हेही वाचा-jioची नवीन वर्षात खास भेट, 98 ते 2020 रुपयांपर्यंत बेस्ट प्लान

Published by: Kranti Kanetkar
First published: January 5, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading