Home /News /technology /

jioची नवीन वर्षात खास भेट, 98 ते 2020 रुपयांपर्यंत बेस्ट प्लान

jioची नवीन वर्षात खास भेट, 98 ते 2020 रुपयांपर्यंत बेस्ट प्लान

नव्या वर्षात ग्राहकांसाठी जिओने 5 नवीन बेस्ट प्लान (Reliance Jio Five Plans) आणले आहेत.

    मुंबई, 05 जानेवारी: वाढत्या स्पर्धेत आपलं स्थान टिकवण्यासाठी जिओ (jio ) सातत्यानं ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स आणि चांगली सेवा पुरवण्यावर भर देत असतं. वोडाफोन (vodafone)आणि एअरटेल (airtal) सारख्या कंपन्यांचे सुरु असणारे नेटकर्क प्रॉब्लेम आणि वाढत्या कॉलरेटमुळे अनेक ग्राहक जिओकडे (jio ) वळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जिओ आपल्या ग्राहकांसाठी नव्या वर्षात नवीन प्लॅन लाँच केले आहेत. तुम्ही जिओचे ग्राहक असाल किंवा जिओमध्ये आपलं सिम पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर हे 5 बेस्ट प्लॅन जरुर जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्त फायदा होऊ शकतो. jio 98 rupees plan- जिओने (jio)ग्राकांच्या खिशाला परवडणारा म्हणजेच Affordable Pack आणला आहे. 98 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला जिओ टू जिओ (unlimited free calling)10 रुपयांचा टॉप-अप मिळेल. जो जिओ ते इतर नेटवर्कमधील ग्राहकांसोबत बोलण्यासाठी असेल. यामध्ये जिओ ते इतर नेटवर्क free calling मिळणार नाही. या प्लॅनची किंमत 108 रुपये होते. जर तुम्ही 108 रुपयांचा रिचार्ज केलात तर तुम्हाला 124 मिनिटं इतर नेटवर्कसाठी मिळतात. Reliance Jio 129 Rupees plan- Reliance Jio ने महिन्याचा म्हणजेच 28 दिवसांसाठी 129 रुपयांचा प्लान आणला आहे. यामध्ये तुम्हाला महिन्याभरासाठी 2 GB 4G डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये प्रतिदिवशी डेटा न देता महिन्यासाठी 2 GB डेटा देण्यात आला आहे. यासोबतच 300 SMS आणि जिओ ते जिओ फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तुम्ही इंटरनेट आणि एसएमएसची सुविधा जास्त वापरत नसाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट प्लान असू शकतो. स्वस्तात मस्त आणि इतर नेटवर्कपेक्षा खूप स्वस्त असा प्लान आहे. Reliance Jio 129 Rupees plan मध्ये कंपनीकडून इतर नेटवर्कसाठी 1000 मिनिटं महिन्याभरासाठी फ्री मिळणार आहेत. याशिवाय तुम्ही टॉप-अप करू शकता. हेही वाचा-टीव्ही पाहणाऱ्यासाठी TRAI कडून गिफ्ट! फक्त 130 रुपयांत 200 चॅनेल, असा आहे प्लॅन Reliance Jio 149 Rupees Plan- या प्लानमध्ये तुम्हाला जिओ ते जिओ unlimited free calling मिळणार आहे. 24 दिवसांसाठी हा प्लान वैध असणार आहे. 1 GB प्रतिदिन डेटा पॅक यानुसार 24 GB डेटा तुम्हाला मिळणार आहे. जिओ ते इतर नेटवर्कसाठी 24 दिवसांसाठी 300 मिनिटं फ्री मिळणार आहेत. यासोबत दरदिवसाला 100 SMS फ्री मिळणार आहेत. Reliance Jio 599 Rupees Plan- जिओकडून 599 रुपयांचा 84 दिवसांसाठी नवा प्लान देण्यात आला आहे. यामध्ये दरदिवशी 2 GB डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ unlimited free calling आणि जिओ ते इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं 84 दिवसांसाठी देण्यात आली आहेत. युझर्सला 84 दिवसांसाठी एकूण 168 जिबी डेटा मिळणार आहे. यासोबत रोज 100 फ्री SMS मिळणार आहेत. Reliance Jio 2020 Yearly Plan- सगळ्या प्लानपेक्षा सर्वात परवडणारा आणि बेस्ट प्लान Reliance Jio 2020 Yearly आहे. जर दर महिन्याला रिचार्जचा एकूण खर्च आणि मिळणाऱ्या फॅसिलिस्टीचा विचार केला तर हा प्लान सर्वात जास्त सेवा देतो. Reliance Jio 2020 Yearly Plan ची व्हॅलि़डिटी वर्षभरासाठी असणार आहे. जिओ ते जिओ अनलिमेटेड कॉल, दरदिवशी 100 SMS एकूण 547.5 GB डेटा मिळणार आहे. दर दिवशी 1.5 GB डेटा प्रतिदिवशी मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी तुम्हाला 12000 मिनिटं फ्री मिळणार आहेत. तुम्ही जर जिओमध्ये पोर्ट करणार असाल किंवा नवीन कनेक्शन घेणार असाल तर 90 रुपये प्राइम मेंबरशिपचे वेगळे भरावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्लानची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही jioच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. हेही वाचा-Android फोन्समध्ये Apple सारखी सुविधा; या कंपन्यांचे नवे फीचर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: JIO, Jio 4G, Jio 4g phone, Jio browser app, Jio Free Internet, Jio sim, Reliance Jio

    पुढील बातम्या