मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Spicejet च्या सिस्टमवर Cyber Attack, अनेक उड्डाणांवर परिणाम

Spicejet च्या सिस्टमवर Cyber Attack, अनेक उड्डाणांवर परिणाम

एयरलाइन्स कंपनी स्पाइसजेटच्या (Spicejet) सिस्टमवर सायबर अटॅक झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणं उशिराने सुरू होती. प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला.

एयरलाइन्स कंपनी स्पाइसजेटच्या (Spicejet) सिस्टमवर सायबर अटॅक झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणं उशिराने सुरू होती. प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला.

एयरलाइन्स कंपनी स्पाइसजेटच्या (Spicejet) सिस्टमवर सायबर अटॅक झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणं उशिराने सुरू होती. प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला.

नवी दिल्ली, 25 मे : एयरलाइन्स कंपनी स्पाइसजेटच्या (Spicejet) सिस्टमवर सायबर अटॅक झाला आहे. मंगळवारी रात्री या हल्ल्यात कंपनीच्या अनेक कंप्यूटर्सवर निशाणा (Spicejet Ransomware Attack) साधण्यात आला. त्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणं उशिराने सुरू होती. प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला. तसंच स्पाइसजेटने फ्लाइट उशिरा असल्याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

स्पाइसजेटने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन या रॅनसमवेअर अटॅकची माहिती दिली. यामुळे सकाळी असणाऱ्या उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला. कंपनीने ट्विटमध्ये सांगितलं, की 'काल रात्री स्पाइसजेटच्या काही सिस्टमवर रॅनसमवेअरचा अटॅक झाला. त्यामुळे फ्लाइटवर याचा परिणाम झाला आहे. आमच्या आयटी टीमवर या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून सिस्टम दुरुस्ती केली आहे. आता उड्डाणं सुरळित सुरू झाली आहेत.'

मनीकंट्रोल डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, अनेक प्रवाशांनी स्पाइसजेट फ्लाइटवर परिणाम झाल्याची परिणाम झाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर केल्या. काही प्रवाशांना एयरपोर्टवर तासंतास वाट पाहावी लागली, तर अनेकजण विमानाच्या आतच अडकले असल्याचं सांगितलं. रॅनसमवेअर अटॅकची माहिती रात्रीच समजली असताना सकाळी पाचपर्यंत प्रवाशांना का माहिती देण्यात आली नाही, असा प्रश्न ट्विटरवर केला जात आहे.

हे वाचा - Android स्मार्टफोन युजर्ससाठी Google Alert, धोकादायक स्पायवेअरचा इशारा

काय आहे रॅनसमवेअर -

रॅनसमवेअर हा एक सायबर अटॅक आहे. या अटॅकमध्ये कंप्यूटरला कंट्रोलमध्ये करुन पैशांची मागणी केली जाते. रॅनसमवेअर युजरला कोणतीही माहिती न देता कंप्यूटर किंवा स्मार्टफोनला नुकसान करणारं सॉफ्टवेअर डाउनलोड करतो. याद्वारे संपूर्ण डेटा हॅकरच्या ताब्यात जातो. हॅकर युजरला त्यांचा डेटा ब्लॉक करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करुन पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो.

First published:
top videos

    Tags: Airplane, Cyber crime, Spicejet, Tech news