• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • GoDaddy वर Cyber ​​Attack; 12 लाख युजर्सचा डेटा लीक, वाचा काय आहे प्रकरण

GoDaddy वर Cyber ​​Attack; 12 लाख युजर्सचा डेटा लीक, वाचा काय आहे प्रकरण

GoDaddy कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 12 लाख Active आणि Inactive युजर्स ज्यांना World Press च्या माध्यमातून मॅनेज केलं जात होतं, अशा युजर्सचे ईमेल ID आणि मोबाईल नंबर्सचा डेटा लीक झाला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : GoDaddy च्या युजर्ससाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. GoDaddy वर युजर्सची प्रायव्हेट माहिती (Cyber ​​Attack on Go Daddy) लीक झाली आहे. याबाबत Go Daddy  इंन्कने खुलासा केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 12 लाख Active आणि Inactive युजर्स ज्यांना World Press च्या माध्यमातून (Data of 1.2 Million Users Leaked Personal Information) मॅनेज केलं जात होतं, अशा युजर्सचे ईमेल ID आणि मोबाईल नंबर्सचा डेटा लीक झाला आहे. GoDaddy चे 1.6% शेयर्स कोसळले -  कंपनीला या डेटा लीकबद्दलची माहिती 17 नोव्हेंबरला मिळाली होती. या माहितीसाठी कंपनीने एका IT Forensic Firm ची मदत घेतली होती. GoDaddy चे Chief Information Security Officer डेमेट्रियस कम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला काही संशयास्पद Activities आढळून आल्या होत्या. त्यानंतर कंपनीने आयटी Forensic Firm ची मदत घेतली होती.

  सावधान! Amazon कडे आहे तुमचा सर्व प्रायव्हेट डेटा? पाहा काय आहे प्रकरण...

  कंपनीने फायलिंगमध्ये म्हटलंय, की डेटा लीकची घटना समोर आल्यानंतर कंपनीने आपल्या सिस्टममधील Unauthorized Third Party ला तात्काळ ब्लॉक करून त्याची चौकशी सुरू केली आहे. 6 सप्टेंबर 2021 पासून जितके थर्ड पार्टी यूजर्स समोर आले आहेत त्या सर्वांना कंपनीकडून ब्लॉक करण्यात आलं आहे. या हॅकिंगदरम्यान काही WordPress Admin Password सायबर ​​Attack वेळी समोर आले होते आणि त्याचा वापरही करण्यात येत होता, त्या सर्वांना कंपनीनं रिसेट करायला सुरूवात केली आहे.

  Koo अ‍ॅपवर Yellow Tick साठी युजर्सला करता येणार Apply; पाहा काय आहे प्रोसेस

  Active ग्राहकांसाठी sFTP आणि डेटाबेस सारख्या युजर्सची नाव, पासवर्ड समोर आले होते. त्यांनाही कंपनीकडून रिसेट करण्यात येत आहे. sFTP हे एक प्रकारचं नेटवर्क प्रोटोकॉल आहे, ज्याद्वारे फाइल Access, File Transfer आणि फाइल मॅनेजमेंट Access करता येतं. त्याचबरोबर याद्वारे इंटरनेट Internet Engineer Task Force Design ही करता येऊ शकतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार काही ग्राहकांसाठी SSL Private Key चा ही खुलासा करण्यात आला आहे. सोबतच अशा ग्राहकांसाठी नवे Certificate जारी आणि Install करण्यात येत आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: