मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /बांबूपासून तयार केलेली Made In India ई-सायकल; जाणून घ्या फीचर्स

बांबूपासून तयार केलेली Made In India ई-सायकल; जाणून घ्या फीचर्स

मेड-इन-इंडिया अंतर्गत इको फ्रेंडली ई-सायकल तयार केली आहे. ज्याची संपूर्ण फ्रेम बांबू (bamboo) आणि कार्बन फायबरने (carbon fibre) तयार करण्यात आली आहे.

मेड-इन-इंडिया अंतर्गत इको फ्रेंडली ई-सायकल तयार केली आहे. ज्याची संपूर्ण फ्रेम बांबू (bamboo) आणि कार्बन फायबरने (carbon fibre) तयार करण्यात आली आहे.

मेड-इन-इंडिया अंतर्गत इको फ्रेंडली ई-सायकल तयार केली आहे. ज्याची संपूर्ण फ्रेम बांबू (bamboo) आणि कार्बन फायबरने (carbon fibre) तयार करण्यात आली आहे.

अहमदाबाद, 1 जानेवारी : लाईटस्पीड मॉबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड ही अहमदाबादची प्रसिद्ध ई-सायकल निर्माता कंपनी आहे. या कंपनीने भारतात मेड-इन-इंडिया अंतर्गत इको फ्रेंडली ई-सायकल तयार केली आहे. ज्याची संपूर्ण फ्रेम बांबू (bamboo) आणि कार्बन फायबरने (carbon fibre) तयार करण्यात आली आहे. ही ई-सायकल moped आणि सायकलच्या दोन्ही बाजून चालवता येणार आहे.

लाईटस्पीड मॉबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपली उत्पादनं Bamboochi नावाने बनवते. बांबू आणि कार्बन फायबरपासून बनवलेली सायकलची फ्रेम याची विशेष बाब आहे. स्टीलच्या तुलनेत बांबू अधिक मजबूत आणि हलका असतो. त्यामुळे Bamboochi च्या सर्व सायकलचं वजन इतर सायकलच्या तुलनेत अतिशय हलकं आहे. या सायकलचं वजन केवळ 15 किलोग्रॅम इतकं आहे.

(वाचा - 108MP कॅमेरासह Xiaomi Mi 10i भारतात लवकरच लाँच होणार; जाणून घ्या फीचर्स)

या सायकलमध्ये कंपनीने एक पोर्टेबल लिथियम आयर्न बॅटरी दिली आहे. जी सिंगल चार्जमध्ये ई-सायकलला 70 किलोमीटरपर्यंत चालण्यासाठी पॉवर देते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ई-सायकलची किंमत 1 लाख 50 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. विदेशात विकण्यासाठी ही सायकल प्रामुख्याने बनवण्यात आली आहे. युरोपियन देशांत ईको फ्रेंडली ई-सायकलची मोठी मागणी आहे.

(वाचा - महत्त्वाची बातमी! FASTag बाबत सरकारचा मोठा निर्णय)

Bamboochi च्या या सायकलही बाजारात उपलब्ध -

या सायकल व्यतिरिक्त लाईटस्पीड सध्या आणखी 5 प्रकारच्या GLYD, WHIZ, DRYFT, RUSH, आणि FURY अशा इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती करते. यातही बांबू आणि कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. या सायकलची किंमत 13,000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंत आहे. या सायकल सिंगल चार्जमध्ये 35 किमी ते 100 किमीच्या रेंजमध्ये चालवल्या जाऊ शकतात.

First published:
top videos