या वर्षात निसाननेही दोन मॉडेल्स भारतीय बाजारातून हटवल्या आहेत. BS6 उत्सर्जन मानक अनिवार्य करण्यात आल्यामुळे निसानने Micra Hatchbak आणि Sunny सेडान कार भारतीय बाजारात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Micra Hatchbak कार जवळपास एक दशकापूर्वी भारतात लाँच झाली होती. कंपनीने 2014 मध्ये या कारला अपडेटही केलं होतं. मात्र आता ही कार भारतीय बाजारात बंद करण्यात आली आहे.